प्रधान मंञी पीक विमा योजना
प्रधान मंञी पीक विमा योजना
ही योजना भारत सरकारकडून सुरुवात करण्यात आलेली योजना आहे .या योजनेची सुरुवात करण्यामागे उद्देश हाच होता की जर एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशा वेळेस शेतकऱ्यांपुढे काही पर्याय उरत नाही व त्यामुळे शेतकऱ्यापुढे फार मोठे आव्हान राहते कारण शेतकऱ्याचा पैसा आधीच पीक उभारणीसाठी गेलेला असतो आणि त्यातच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड निराशा येते कारण आता शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान कोण भरून देणार याची शाश्वती त्याला नसते आणि आता परत दुसरी पिक परत उभे करण्यासाठी त्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागतो यासाठी हा त्रास होऊ नये त्यामुळेच केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पिक विमा या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश हाच आहे जरी अवकाळी पाऊस आला किंवा महापूर आला तर त्या शेतकऱ्याच्या पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात
प
प्रधान मंञी पीक विमा योजना
प्रधान मंञी पीक विमा योजनेचा उद्देश
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश जर एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी हा या पिक विमा उद्देश आहे नैसर्गिक संकट म्हणजे एखाद्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन सर्व पिके पिके वाहून जाण किंवा पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठून राहते त्यामुळे पीक खराब होऊन जाते. अशावेळी जर दुसरी पिक उभा करायचे असेल तर त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असते आणि जर त्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला असेल तर शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरीत्या मिळवता येते.
पीक विमा योजना पाञता व अटी
Pik vima yojana Eligibility and Conditions
पिक विमा योजनेच्या पात्रता व अटी खालील प्रमाणे आहेत
पाञता
Eligibility
१)या योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात
२)जर आपण शेती करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर आपणास पिक विमा भरणे बंधनकारक आहे
३)ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही असे शेतकरी जर या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर ते पीक विमा उतरवू शकतात
अटी
Conditions
१)पिक विमा त्या पिकासाठी लागू असेल जी पिक पिक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट केलेले आहेत
२)पिक विमा करत असताना योग्य अशी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे
१)सातबारा उतारा
२)बँक पासबुक
३)आधार कार्ड
प्रधान मंञी पीक विमा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र
Prdhanmantri pik vima yojana documents
१)आधार कार्ड
२)पॅन कार्ड
३)सातबारा उतारा
४)पीक लागवड दाखला
५)बँक पासबुक
६)पासपोर्ट साईज फोटो
प्रधान मंञी पीक वीमा कधी सुरू झाली?
प्रधान मंञी पीक विमा योजनेची सुरुवात १९८५ या वर्षी राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरुवात करण्यात आलेली योजना आहे.
उत्पन्नावर आधारित असणारा पीक विमा म्हणजेच काय?
पीक वीमा हा एक विम्याचा साधा प्रकार आहे .ज्यामध्ये जर आपण पीक वीमा जर भरला असेल तर आपणास पीकाची जी झालेले जे नुकसान आहे ते नुकसान भरून मिळते.उत्पन्नावर आधारित पीक विमा म्हणजेच आपल्या एखाद्या पीकाच उत्पादन जर आपणास कमी प्रमाणात मिळाले तर आपणास पीक विमा मिळतो.