अन्नदाता शेतकरी

अन्नदाता शेतकरी

शेतकरी हा अन्नदाता आहे .कारण या जगात सर्व काही मिळेल पण चांगल अन्न जर कोणी देईल तर तो शेतकरी असेल.कारण भविष्यात सर्व काही मिळेल पण चांगल अन्न हे माञ शेतकऱ्यांशिवाय कुठही मिळणार नाही .भविष्यात सर्व व्यवसाय बंद पडले तरी शेती हा एक व्यवसाय असा आहे की तो कधी बंद पडणार नाही .कारण या जगाने पाहील आहे की ज्या वेळेस कोरोना आला होता त्यावेळेस सगळेजण घरात बसले होते माञ शेतकरी हा एक असा होता जो स्वतःचा जीव धोक्यात घालून शेती करत होता .व तो आपला भाजीपाला हा लोकांपर्यंत पोहोचवत होता कारण शेतकरी हा एकटाच असा होता की तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेती करत होता .चांगल अन्नधान्य आपल्या शेतात निर्माण करत होता 



अन्नदाता शेतकरी


अन्नदाता शेतकरी



.


शेतकरी हा स्वतः जरी अन्नधान्य पीकवत असला तरी त्या पीकाचा दर ठरवण्याचा अधिकार माञ शेतकऱ्यांना नाही .येणाऱ्या काही वर्षांतmarcadibenz सारखी गाडी घेणारा शेतकरी असेल .या जगात सर्व काही मिळेल पण चांगल अन्न मात्र मिळणार नाही आणी तो पिकवणारा शेतकरी असेल.त्यामुळेच शेतकऱ्यांनो आपल्या जमीनी विकु नका नाहीतर परत व्यापाऱ्याच्या शेतावर जाऊन शेती करावी लागेल. 



शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा अस म्हणतात कारण शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा आहे.कारण शेतकरी हा स्वतः शेतीत कष्ट करून अन्न धान्य पिकवतो व कारण अन्न धान्य हे कुठल्याच कारखान्यात पीक नाही ते जमीनीतच पीकते आणी जमीन पिकवणारा असतो तो म्हणजेच शेतकरी 




शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा असुनही शेतकऱ्यांना समजुन कोण घेत नाही कारण क्रिकेट ग्राउंडवर खेळणारा खेळाडू हा प्रत्येकाला स्टार वाटतो .पण इथ रानात कष्ट करून घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याची  दखल मात्र कोणीच घेत नाही .कारण शेती करणाऱ्या शेतकऱ्याची दखल कोणी घेत नाही .कारण जर शेतकऱ्याला जर एखाद खत हे घ्यायच असेल तर तो एका दुकानात जातो त्या दुकानात खताची चौकशी करतो आणी म्हणतो की आता माझ्याकडे पैसे नाहीत मी एटीएम मधुन पैसे काढून घेऊन येतो अस म्हणून तो दुसऱ्या दुकानात जाऊन खताची चौकशी करून ठरवतो की कुठल्या दुकानात खत घ्याव .याउलट जर त्यांना त्याच्या मुलांनी सांगितल की बाबा आपल्याकड अँड्रॉइड मोबाईल आहे व आपण खताच्या किमती या मोबाईल वर पाहू शकतो हे जर शेतकऱ्यांच्या मुलांनी जर त्यांना सांगितल तर  त्या शेतकऱ्याचा वेळ वाचेल. 






शेतकरी जरी अन्नदाता असला तरी त्याच जगण कोण मान्य करायला तयार नाही .कारण जर शेतकरी म्हणला तर त्या शेतकऱ्याच आभाळाकड डोक एवढेच आणी शेतकऱ्यांच्या डोक्यावर हात अस शेतकऱ्याकड पाहील जात .शेतकऱ्याच्या जीवनात होणारा बदल हा माञ कोणाला मान्य नाही .शेतकरी हा सगळ्या जगाचा पोशिंदा असला तरी तो स्वतः माञ उपाशी पोटी राहुन कष्ट करून जीवन जगत असतो .







Previous Post Next Post