शेतीला भविष्य आहे का
शेतीला भविष्य आहे का कारण आजच्या युगात तरुण पिढी शेती करण्यासाठी तयार होत असताना आपल्याला दिसत आहे. .कारण शेती भविष्यात काही फायदा नाही अस तरुण पिढीला वाटत आहे .पण जर शेती कुणीच जर केली नाही तर अन्नधान्याचा तुटवडा पडेल आणी उपासमारीची वेळ येईल. भविष्यात जरी सगळे व्यवसाय जरी बंद पडले तरी एकमेव व्यवसाय असा आहे की तो बंद पडणार नाही .या जगात सर्व काही मिळेल माञ चांगल अन्नधान्य मात्र शेतीशिवाय उपलब्ध होणार नाही
या जगाने पाहील आहे की ज्या वेळेस कोरोना आला होता त्यावेळेस जगातील सर्व व्यवसाय बंद पडले होते .त्या वेळेस एकच व्यवसाय चालु होता तो म्हणजेच शेती .त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भाजीपाला हा प्रत्येक माणसाच्या दारात पोहचवला.
भविष्यात शेती हा चांगला कसा होऊ शकतो. सध्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती बरीच शेतकरी करत आहेत त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे ज्ञानेश्वर बोडके सारख्या शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस शेतीतून जास्त नफा मिळवला आहे . कारण सध्या बरेच शेतकरी आपल्याकडे कमी जमीन आहे म्हणून बांध हे कोरत असतात कारण त्यांना वाटतं की आपल्याकडे जमीन कमी आहे पण त्यांना आपल्याकडे आहे त्या शेतीत जास्तीत जास्त उत्पादन घेता येत याची जाणीव झाली तर तो शेतकरी बांध पो करणार नाही. कारण सध्या बरेच शेतकरी पॉलिहाऊस ची शेती करत आहेत त्या शेतीच्या माध्यमातून बराच नफा कमवत आहेत त्यातून ते सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची पिकं घेत आहेत प्रत्येक महिन्याला त्या भाजीपाल्याची विक्री थेट ग्राहकांपर्यंत जाऊन करत आहेत त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळत आहे.