पीएम किसान योजना

पीएम किसान योजना

 ही योजना भारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असणारी योजना आहे .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येते .पीएम किसान सन्मान निधी योजना ही ऐक महत्त्वाची योजना आहे.जी योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठीच सुरू करण्यात आली आहे.ही योजना ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येत असते त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.


पीएम किसान योजना

पीएम किसान योजना



  




पीएम किसान सन्मान निधीसाठी काही अटी व पाञता आहेत ते खालील प्रमाण 



पाञता



१)शेतकऱ्यांच्या नावावर दोन हेक्टर  किंवा त्यापेक्षा कमी जमीन असण आवश्यक आहे.





२)या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असावा





३)शेतकऱ्यांच आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक केलेल असण आवश्यक आहे.







४)शेतकऱ्यांच बॅंक खात राष्ट्रीय कृत बँकेत किंवा  स्थानिक बॅंकेत असण आवश्यक आहे.







अटी



१) या योजनेसाठी अर्ज करत असताना सर्व अचूक माहिती भरावी .जर चुकीची माहीती भरली तर अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते.





२)या योजनेसाठी जर एखाद्या शेतकऱ्यास अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या जवळच्या महाइसेवाकेंद्रात जाउन त्याचा ऑनलाईन अर्ज भरू शकतो.





३)ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.







या योजनेसाठी पात्र नसणारे शेतकरी


१)संस्थात्मक शेतकरी 



२)ज्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय नोकर आहे असे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत 




या योजनेचा उद्देश 



१)या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच उत्पादन वाढवण



२)सध्या शेतीत महागाई वाढत चालली आहे त्यामुळेच या वाढत्या

खर्चाचा भार हलका व्हावा  आणी शेतकऱ्यांना शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळाव 





३)जर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य जर मिळाल तर शेतकरी आपल्या शेतीत अतिशय उत्साहात काम करू शकेल



४)शेतकऱ्यांच्या उत्पादनात जर वाढ झाली तर  तर ग्रामीण भागातील  उघोग व्यवसायाला चालना मिळेल त्यामुळेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारेल 



 


या योजनेसाठी लागणारी कागदपत्र 



१)आधार कार्ड 



२)या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे  बॅंकेत लिंक केलेल असाव 



३)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असण आवश्यक आहे.




४)या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांकड मोबाईल नंबर असण आवश्यक आहे.






पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा



१)या योजनेसाठी जर आपणास अर्ज करायचा असेल तर जवळच्या महाइसेवाकेंद्रात जाउन pm kissan yojna या वेब साईटवर जाऊन आपण आपला अर्ज करू शकतो.






२)त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी या मुखपृष्ठावर जाउन Farmer corner या विभागात जाऊन New farmer rejestration या पर्यायावर जाउन क्लिक करा.







३)आवश्यक ती माहीती भरल्यानंतर कागदपत्र अपलोड करावी

Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming