Veritical farming
Veritical farming शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये veritical farming बाबत माहिती घेणार आहोत.
Veritical farming
[[veritical farming म्हणजे काय तर कमी जागेत जास्तीत जास्त कसे उत्पादन घ्यायचे.]]
सर्वात मोठा जो प्रश्न आहे की वाढती लोकसंख्या या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक कुटुंबात जमिनीचे वाटप होत आहे .पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे जमीन भरपूर प्रमाणात होती पण आता जसजसे जमिनीचे वाटप होत गेलं तसतसे जमीन अतिशय कमी प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर होत गेली आणि त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी राहिले आता जास्त प्रमाणात शेती असणारे असे शेतकरी थोडीफार उरले आहेत.
त्यामुळे सध्या जमिनीची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आता आपण बघतो की बरेच ठिकाणी भाजीपाला हा आपल्या टेरेसवर पिकवला जातो. बऱ्याच ठिकाणी जमिनीची कमतरता असल्यामुळे विशेषतः शहराच्या ठिकाणी जमिनीची अतिशय कमतरता भासत असते अशा ठिकाणी टेरेसवर भाजीपाला केला जातो.
एखाद्या शेतकऱ्याकडे जर अल्पभूधारक शेती असेल तर त्या शेतकऱ्यांसाठीveritical farming अतिशय फायदेशीर ठरू शकते.veritical farming म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडत असेल veritical farming म्हणजे उभी शेती
Veritical farming ही शेती आपल्या पारंपरिक शेती पेक्षा वेगळी आहे आपल्या पारंपरिक शेतीला शेती करण्यासाठी जास्त प्रमाणात जमीन लागते पण जर आपणvertical farming केले तर आपल्याला अतिशय कमी प्रमाणात जमीन लागते.
ही शेती करत असताना आपल्याला नांगरणी खुरपणी आणि कोळपणी यांची आवश्यकता भासत नाही कारण ही शेती पॉलीहाऊस मध्ये केली जाते त्यामुळे पॉलिहाऊस असल्यामुळे या शेतीत गवत वगैरे होत नाही
[[Veritical farming मध्ये वापरली जाणारी माती कशी असावी]]
Veritical farming करण्यासाठी आपण लाल माती वापरू शकतो कारण लाल माती ही काळ्या मातीपेक्षाही भुसभुशीत असते आणि दुसरा फायदा म्हणजे जर आपल्याकडे पाणी जरी कमी असले तरी ती माती घट्ट किंवा कडक होत नाही. जर आपणास माती कडक होऊ नये असं वाटत असेल तर आपण शेण खताचा उपयोग करावा जर आपण शेणखत वापरलं तर त्या खताचा शेतीसाठी फायदा आहे.
[[Veritical farming मध्ये रोगराईचे आणि किडीचे नियोजन कसे केले जाते.]]
या शेतीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे किडीचा प्रादुर्भाव होत नाही.कारण पाॅलीहाउस मध्ये पावसाच पाणी जात नाही.आणी उन्हाळ्यात मात्र जरी तापमान जास्त असल तरी आपण तापमान नियंञित करू शकतो.त्यामुळेच आपल पीक खराब होत नाही.
[[Veritical farming शेतीत पीकांना पोषक द्रव्य कशी मिळतात]]
लाल माती ही शेती साठी उपयुक्त आहे .आपण आपल्या पीकांची लागवड मातीपरिक्षण करून करावी .कारण मातीपरिक्षण केल्यामुळेच आपणास जमिनीत कुठल्या घटकाची कमतरता आहे हे जाणवते .त्यामुळेच आपण आपल्या मातीच परिक्षण केल तर आपण आपल्या पीकांना योग्य ते खत देउ शकतो.त्यामुळेच झाडांना आपण पोषक द्रव्य देउ शकतो.
[[Veritical farming नैसर्गिक आपत्तीपासून कस कराल पीकाच रक्षण]]
Veritical farming मध्ये आपल पीक हे पाॅलीहाउस मध्ये असल्यामुळे यामध्ये नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता कमी असते.जर एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाउस झाला तर त्या ठिकाणी जर पाणी साचले तर त्या ठिकाणी झाडांची नासाडी होते.
[[Veritical farming करताना काय काळजी घ्यावी लागते.]]
Veritical farming करत असताना आपण त्या प्रत्येक झाडाला योग्य प्रमाणात पाणी पडत आहे की नाही हे तपासून पाहण. गरजेच असत.
[[Veritical farming कोण करू शकतो]]
Veritical farming ही सध्या काळाची गरज बनत चालली आहे कारण सध्या बऱ्याच शेतकऱ्यांकड अल्पभूधारक जमीनी आहेत त्यामुळेच त्या जमिनीत जर आपणास मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायच असेल तर आपण veritical farming करू शकतो.
[[Veritical farming का करायला हवी आणी फायदे काय]]
Veritical farming केल्यामुळेच 80ते85टक्के पाण्याची बचत होते. त्यामुळेच ज्या शेतकऱ्यांकड पाण्याची कमतरता असेल त्या शेतकऱ्यांनी veritical farming करायला हवी .सोबतच उत्पादनात ही वाढ