शेतीतील आधुनिक तंत्राचा भरघोस उत्पादनासाठी होणारा उपयोग
शेतीतील आधुनिक तंत्राचा भरघोस उत्पादनासाठी होणारा उपयोग. भारतीय शेती पारंपारिक पद्धतीन केली केली जाणारी शेती म्हणून ओळखली जाते.
भारतीय शेतकरी पुर्वी आपली शेती ही पारंपारिक पद्धतीन करत असल्यामुळेच शेतीतील उत्पादन अतिशय कमी प्रमाणात असायच .
कारण पुर्वी शेतकऱ्यांची शेती ही पाट पाण्यावर अवलंबून असायची त्यामुळेच शेतकऱ्याला आपल्या पीकांना योग्य प्रकारे पाणी देता येत नसायचे आणी जर पाणी असेल तर त्या शेतकऱ्याला लाइट वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळेच पीकांना फार मोठा तोटा सहन करावा लागायचा .
पुर्वी शेती ही पाट पाण्यावर अवलंबून असल्यामुळेच आपल्याला आपल्या पीकांना खत सुदधा वेळेवर देता येत नव्हती पण आता ड्रिप इरिगेशन असल्यामुळेच आपणास पीकांना लागेल त्या वेळेस पाणी मिळत त्यामुळेच आपल्या पीकांना वेळेवर पाणी मिळू लागल व त्यामुळेच आपल्या पीकाची वाढ ही चांगल्या पद्धतीन झाली व त्यामुळेच आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ झाली.
ड्रिप इरिगेशन ची सोय असल्यामुळेच आपल्याला पीकांना वेळेवर पाणी मिळु लागल आणी जरी लाइट चा प्रॉब्लेम आला तरी काही अडचण येत नाही .जर आपल पीक हे पाटपाण्यावर असेल तर आपण जर एखाद्या सरीवर पाणी लावल आणी अचानक जर लाइट गेली तर आपणास ती सरी परत भीजवावी लागते .
याउलट ड्रिप इरिगेशन मूळ सगळ्या पीकांना एकावेळेस पाणी जात त्यामुळेच सर्व पीकाची उगवण चांगली होते आणी त्या पीकाची वाढ सारखी होते .कुठे बारीक कुठ मोठ अस पीक अजीबात येत नाही .
.आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल ऊत्पादन आपण अतिशय चांगल्या प्रमाणावर घेऊ शकतो .जस की आज आधुनिक तंत्रज्ञानावर पाॅलीहाउस सारखी शेती असेल आज पाॅलीहाउस हे शेतकऱ्यानी आपल्या रानात उभ केल आहे आणी त्या पाॅलीहाउस च्या जोरावर शेतकऱ्यानी आपल्या शेतीत नवनवीन बदल करून आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ केली आहे
.कारण ज्ञानेश्वर बोडके सारख्या शेतकऱ्यानी एक एकर च्या पाॅलीहाउस च्या शेतीतून करोडोची उलाढाल केली आहे .आज ज्ञानेश्वर बोडके यांच्याबरोबर बरेच शेतकरी काम करत आहेत आणी तेसुदधा पाॅलीहाउस च्या शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत.
[[शेती व शेतीतील अवजारे]]
पुर्वी शेतकरी आपली शेती ही बैलाच्या साहाय्याने शेती करायचा त्यामुळेच शेतकऱ्यांना पीकाची लागवड भरपूर प्रमाणात वेळ घालवावा लागायचा. कारण शेतकरी हा शेतीची
सर्व काम जस की पेरणी नांगरणी अशी काम शेतकरी करायचा त्याला ते काम करण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागायचा .त्यामुळेच शेतकऱ्यांची पेरणी नांगरणी सारखी काम वेळेवर होत नसायची .पण आता आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळेच आपण जर आपल्या रानाची नांगरट करायची असेल तर ती काही तासातच करू शकतो .जर आपल्याला पेरणी करायची झाली तर आधुनिक यंञाच्या साह्याने काही तासांतच आपण पेरणीच काम करू शकतो .पुर्वी जर पेरणी करायची असेल तर शेतकऱ्यांस पेरणी करण्यासाठीच माणसाची गरज भासायची पण आता पेरणी यंञ असल्यामुळेच आपल्या शेतीतील पेरणीची काम काही वेळातच पुर्ण होउ लागली ▪︎
१)नांगर=शेतीतील अवजारापैकी नांगर हे एक अवजार आहे .या अवजाराच्या साहाय्याने आपण आपल्या रानाची नांगरट करू शकतो ▪︎
२)पेरणी यंञ = पेरणी यंञ हे शेती अवजारापैकी ऐक अवजार आहे .पेरणी यंञाच्या साह्यने आपण आपल्या रानातील पेरणीची काम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो .जस की मका,बाजरी अशी पीक▪︎
३)सरी अवजार =या यंञाच्या साह्याने आपण आपल्या उसाची सरी सोडू शकतो▪︎
४)फण =हे एक शेतीतील मशागतीसाठी वापरल जाणार अवजार आहे .फण यंञाचा उपयोग आपले रानाची फणणी करण्यासाठीच केला जातो. त्यामुळेच आपण आपल्या रानातील तण काढु शकतो ▪︎
५)रोटावेटर =हे एक शेतीतील असणार अवजार आहे. याचा उपयोग आपले रान रोटरून रानातील तन नियंत्रण करण्यासाठीच याचा उपयोग केला जातो ▪︎
पावर ट्रेलर =हे एक शेतीची मशागत करण्यासाठी वापरल जाणार अवजार आहे.पावर ट्रेलर च्या माध्यमातून शेतीची मशागत करण्यासाठीच होतो .आपण पावर ट्रेलर च्या माध्यमातून उसाची खांदणी करून घेउ शकतो .पावर ट्रेलर च्या माध्यमातून आपण रानातील तन नष्ट करू शकतो▪︎
शेती व शेतीतील अवजार याचे फोटो
पलटी नांगर
पेरणी यंञ
https://t.me/+C701lsoTVQ43ZmI1