ज्ञानेश्वर बोडके एक प्रयोगशील शेतकरी
ज्ञानेश्वर बोडके एक प्रगतशील शेतकरी
भारतीय शेतकरी किंवा भारतातील लोक शेतीला अतिशय डबघाईस आलेला व्यवसाय आहे अस समजतात. ज्ञानेश्वर बोडके यांनी शेती क्षेत्रात फार मोठे काम केले आहे .
पुर्वाच्या काळात पाहीला गेल तर एकञ कुटुंब असायची त्यामुळेच एका दहा वीस तरी माणस असायची हळू हळू एकञ कुटुंब पद्धत कमी होत गेली व शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाटण्या होत गेल्या.
त्यामुळेच काही शेतकऱ्यांकड जमीन एक किंवा दोन एकर अशीच राहीली त्यामुळेच ज्या शेतकऱ्यांकड जास्त जमीन तो शेतकरी श्रीमंत व जो शेतकऱ्यांकड कमी जमीन आहे तो शेतकरी गरीब होउ लागला .त्यामुळेच त्यांनी अभिनव फार्मर नावाची कंपनी त्यांनी तयार केली .त्या एक एकर शेतात त्यांनी शेड नेट पाॅली हाउस उभा केले
.त्यामुळेच शेतकऱ्यांच्या भाजीपाला खराब होण्याची भीती राहीली नाही .कारण पाॅलीहाउस असल्यामुळेच जरी पाउस आला तरी चिंता नाही आणी उन्हाळ्यात जास्त तापमान झाल तरी काही अडचण येत नाही .त्या पाॅलीहाउस मध्येच त्यांनी एकात्मिक भाजीपाला लावला त्यांनी पाच पाच गुंठयात वेगवेगळया प्रकारचा भाजीपाला लावला .
आणी बांधावर त्यांनी वेगवेगळ्या सिझनेबल फळांची लागवड केली त्यामुळेच त्यांना त्या फळझाडापासून उत्पादन येण्यास सुरुवात झाली आणी त्यांच्या उत्पादनात वाढ झाली
.त्यांनी सुरुवातीला फुल शेतीची लागवड ही आपल्या पाॅलीहाउस मध्ये केली होती नंतर त्यांच्या लक्षात आले फुलाला काही सिझनमध्येच जास्त मागणी असते .
या जगात जोपर्यंत माणस आहेत तोपर्यंत चालणारा व्यवसाय हा शेती हा व्यवसाय आहे.जगात सर्व काही मिळू शकत मात्र अन्न हे शेतीतून तयार होणार आहे. त्यामुळे शेती हा व्यवसाय कधी बंद पडणार नाही .या जगात सर्व काही मिळेल पण चांगले अन्न जर पाहीजे असेल तर शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही .कारण कोरोना ज्या वेळेस आला होता त्यावेळेस सर्व कंपन्या बंद होत्या त्यावेळेस शेती हा एक व्यवसाय असा होता तो चालू होता.शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भाजीपाला पीकवला व कोरोनाच्या भीतीने कोणी घरातून बाहेर सुदधा पडत नव्हते .अश्या वेळेस शेतकऱ्यांनी शहरात जिथे सोसायटी आहे तिथे सोसायटीत जाउन आपला भाजीपाला विकला .
त्यामुळेच तेथील लोकांची भाजीपाला घेण्यासाठी होणारी धावपळ थांबली व त्यांना चांगला भाजीपाला घरबसल्या मिळू
विक्री व्यवस्थापन
.त्यामुळेच त्यांनी भाजीपाला लावण्याचा निर्णय घेतला आणी त्यांनी ऑरगॅनिक भाजीपाला हा आपल्या पाॅलीहाउस मध्ये लावला.त्यांनी भाजीपाला हा मुंबई मार्केट ला पाठवण्याचा निर्णय घेतला पण त्यांना पाहीजे तेवढा अपेक्षित असा दर त्यामधून मिळत नव्हता त्यामुळेच त्यांनी भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला.
कारण जर आपण आपला शेतीमाल व्यापाऱ्याला दिला तर आपल्याला चांगला नफा मिळणार नाही त्यामुळेच त्यांनी डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतलाट
त्यासाठी त्यांनी पुणे व मुंबई या ठिकाणी सोसायटीत जाउन आपला भाजीपाला विकण्यास सुरुवात केली सुरुवातीलाच त्यांना त्यासाठी खुप ञास झाला व ऑर्गेनिक भाजीपाला इतर भाजीपाल्यापेक्षा महाग असल्यामुळेच तो भाजीपाला विकण्यासाठी त्यांनी आपला एक व्ह्टसॲप ग्रप बनवला व ज्या ग्राहकांना भाजी हवी आहे त्या ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पॅकिंग करून विक्री केली .
.इतर रासायनिक भाजीपाल्या पेक्षा ऑर्गेनिक भाजीपाला हा पचण्यास अतिशय हलका आणी तो खाल्ल्यावर लगेच पचतो. त्यामुळेच गॅस ॲसिडीटी होत नाही व पचण्यास तो अतिशय हलका असतो ती भाजी चवीला अतिशय छान लागते .
त्यामुळेच त्या भाजीपाल्याची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढू लागली त्यामुळेच त्यांनी अभिनव फार्मर या नावाने ग्रुप स्थापन केला व यामध्ये बरेच शेतकरी सहभागी होउ लागले .त्यामुळेच त्यांच्यावर जबाबदारी वाढू लागली व बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीसाठी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना फोन करू लागले व त्यांना आपल्या प्लाॅटवर बोलवू लागले त्यामुळेच त्यांचा वेळ वाया जावू लागला .
त्यामुळे त्यांनी जर एखाद्या शेतकऱ्यांच्या प्लाॅटवर जायचे असेल तर त्यांनी त्यासाठी वेळेचे पैसे घेण्यास सुरुवात केली त्यामुळेच त्यांना जो लोकांचा होणारा ञास कमी झाला .
आता त्यांच्या कंपनीचा विस्तार फार वाढला होता व्याप ही भरपूर प्रमाणात वाढत चालला होता .आता त्यांनी काही सुशिक्षित तरूणांना सोबत घेऊन आपल्या भाज्या पॅकिग पासुन मार्केटिंग ची जबाबदारी त्यांनी सोपवली .आता तरीपण आता कामगारांची संख्या कमी पडू लागली. कारण बरेच लोक बाहेर कसलही काम करतील पण शेतीत मात्र काम करणार नाहीत त्यामुळेच आता यंदाची गरज आहे .कारण एक यंत्र 10माणसाच काम करत.