आपल्या देशात नैसर्गिक वातावरण अतिशय चांगल आहे.
भारतात विविध प्रकारची फळांच उत्पादन घेतल जात.
भारतातील 75टक्के शेतकरी शेती करतात आणी भारतातील बऱ्याच लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे.
भारतात शेती माञ पारंपारिक पद्धतीन शेती केली जाते .
शेती शेतीतील अडचण
भारतीय शेतीला जरी चांगल वातावरण मिळाल असल तरी भारतीय शेतकरी हा कधीतरी अडचणीत सापडतो.
नैसर्गिक वातावरण खराब असल्यामुळेच कधी महापूर तर कधी पाण्यावाचून पीक जळून जातात.
भारतीय शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणारे भरपूर आहेत पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत माञ कोणी करत नाही .
कारण आपल्यातील लोकांना टीव्हीवर एखादा स्टार जर शेतात काम करतांना दाखवला तर त्या स्टारच्या कौतुकासाठी हजारो लोक पुढ येतात. 'Farmers'
मात्र आपल्या शेतात दिवस रात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाची दखल मात्र कोणीही घेत नाही क्रिकेट च्या मैदानावर खेळत असणारा खेळाडूंवर हजारो रूपयांच्या पैजा लागतात.
आजकाल च्या मुलांना सिनेमात जीम मध्ये घाम गाळणारा स्टार खुपच छान वाटतो .माञ शेतात दिवस रात्र कष्ट करणार्या शेतकऱ्याची दखल मात्र कोणीच घेत नाही .
शेतकऱ्यांना सहानुभूती सगळेच देतात पण त्याच्या पाठीमागे खंबीर पण उभ माञ कोणी राहत नाही .
शेतकऱ्यांसाठी बऱ्याच अश्या योजना आहेत त्या योजना माञ शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत.
शेतकरी जरी कुठल एखाद औषध घेण्यासाठी जर एखाद्या दुकानात गेला तर त्या दुकानदारांवर शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही .
तर शेतकरी त्या दुकानदाराला म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत मी एटीएम मधुन पैसे काढून घेऊन येतो अस म्हणून तो शैतकरी दुसर्या दुकानात जातो व त्या औषधाची चौकशी करतो.
.शेतकऱ्याला जर त्यांच्या मुलांनी सांगितल की पप्पा आपल्याकडे मोबाईल आहे व आपण इंटरनेट च्या माध्यमातून त्या औषधाची किंमत किती आहे हे पाहू शकतो .तर त्या शेतकऱ्यांची होणारी धावपळ कमी होईल.
पण सध्या शेतकऱ्यांची मुल शेती करायला तयार नाहीत. व आई वडील त्या मुलाला सांगतात अरे आम्ही शेती केली पण तु शेती करू नकोस त्यामुळेच सध्या गावातील तरुण मुल कामासाठी शहरात जातात. मिळेल त्या पगाराची नोकरी करतात.
याउलट शिकलेल्या मुलांनी जर शेतीत उतरल व नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल .
शेतकऱ्यांना सहानुभूती सगळेच जण देतात.आता शेतकऱ्यांना सहानुभूतीची नाही त्याच्याबरोबर उभा राहण्याची गरज आहे.
.शेतकरी बांध का कोरतो कारण एखाद्या शेतकऱ्यांकड 10एकर जमीन असेल त्या शेतकऱ्यांच जास्त उत्पादन मिळत त्यामुळेच एखादा कमी राण असणारा शेतकरी हा बांध पोकरतो
.पण त्या शेतकऱ्यांना जर सांगितल तुमच्याकडे जेवढी जमीन आहे तेवढीच आपल्या साठी आहे.पुण्यातील ज्ञानेश्वर बोडके यांनी एक एकर शेतीवर कोटीची उलाढाल केली एकात्मिक शेतीचा फायदा काय आहे हे त्यातून दिसून येतो .
भारतीय शेतकरी हा शेती हा परंपरागत चालत आलेल्या पद्धतीन करत असतो कारण शेतीत जर उत्पादन वाढाव अस जर शेतकऱ्यांना वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करून आपल्या उत्पादनात वाढ करता येईल .
पुर्वी शेती ही पाट पाण्यावर अवलंबून होती पण आता शेती ही ड्रिप इरिगेशन च्या माध्यमातून केली जाते.
ड्रिप इरिगेशन मूळ आपण रानातील पीकात औषध ड्रिप च्या माध्यमातून सोडू शकतो त्यामुळेच उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल .
ड्रिप इरिगेशन मूळ खते मातीआड टाकण्याचा खर्च बऱ्याच प्रमाणात वाचला आहे .त्यामुळेच शेतीवर होणारा खर्च टाळण्यात येतो .
आज काल शेतकऱ्यांसाठी शासकीय बऱ्याच योजना आहेत पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक फेरा नोंद वावा लागतो पण पीक फेरा हे अॅप्लिकेशन घेण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन ची गरज असते पण बऱ्याच शेतकऱ्यांकड अजुन सुदधा लहान मोबाईल आहेत त्यामुळेच ते शेतकरी पीक फेरा कसे नोंद वरील व त्यांना नुकसानभरपाई कशी मिळणार.