शेती व शेतीतील अनुभव

🟥{{ शेती व शेतीतील अनुभव }}🟥

⏸️शेती करत असतानाच आपण शेतीतील अनुभव घेत असतो .त्यामुळेच आपण पाहणार आहोत शेती व शेतीतील अनुभव ⏸️










🔶️शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे .कारण आपल्या भारतातील 70टक्के लोक शेती करतात. कारण भारतीय लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे .आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून  आहे .कारण आपल्या देशातील शेतकरी प्राचीन काळापासून जुनाट पद्धतीन शेती करत होता .कारण आपल्या देशात तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळेच आपल्या देशातील शेतकरी हा पाट पाण्यावर शेती करत आहे त्यामुळेच आपल्या  देशातील शेतकऱ्यांच जीवनमान अतिशय धावपळीच झाल आहे.  कारण  शेती हा एक असा व्यवसाय आहे.  त्यामुळेच  शेतकयांच जीवनमान बदल झाला .पण आपल्या देशातील शेतकऱ्यांच जीवनमान सुधाराव अस जर वाटत असेल तर आपण शेतीला  चांगल दिवस आणणार गरजेच आहे. कारण आपल्या देशात शेतकरी पाट पाण्यावर शेती करत असल्यामुळेच आपल्या देशातील शेतकरी पीकांना वेळेवर पाणी देण्यास असमर्थ होतात .त्यामुळेच काय होत आपल्या देशातील शेतकऱ्यांच उत्पादन घटत आहे. त्यामुळेच उत्पादन वाढाव यासाठीच आपण शेतीत बदल करण आवश्यक आहे .शेतीला आता नवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे कारण पुर्वी शेतकरी शेती ही बैलादवारे आपल्या शेतातील कामे करायचा पण आता मात्र अस करण शक्य नाही कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांकड  जमीन या प्रचंड प्रमाणात आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना बैलादवारे एवढी शेती करण शक्य होणार नाही.   कारण जर आपण शेती जुनाट पद्धतीन जर केली तर वेळ लागतो पण आता ट्रॅक्टर च्या साहाय्याने ही काम फास्ट होउ लागली त्यामुळेच आपण आधुनिक शेतीकड वळण ही काळाची गरज झाली आहे◾️





🟥{{पीकपदध्त व सिंचनाची पद्धत कशी असावी}}🟥

🔶️आपल्या देशात काय काय भागात  पावसावर अवलंबून असणारी पीक घेतली जातात .त्यामुळेच त्या भागातील लोक पहीला पाउस पडला तर लगेच पिकाची लागवड करतात त्यामुळेच काय होत जर एखाद्या वेळेस पाउस पडला नाही तर त्या शेतकऱ्यांच फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत .कारण शेतकरी हा फक्त शेतीवर अवलंबून असल्यामुळेच शेतकऱ्यां समोर दुसरा कुठला पर्याय नसतो .आपल्या देशात आजही बरेच लोक पाट पाण्यावर शेती करतात तर शेतकऱ्यांना राञी अपराञी धावपळ करावी लागते .आपल्या शेतीत जर आपल्याला बदल करायचा असेल तर आपण शेतीला ठिबक सिंचनाचा वापर केला पाहीजे कारण ठीबक सिंचनामूळ शेतकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे .जर आपणास शेती करायची तर ती फायदेशीर व्हावी यासाठीच आपण नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहीजे .शेतीत बदल करून आपण भाजीपाला शेतीकड आपल्याला मागणी वाढत चालली आहे त्यामुळेच आपण भाजीपाला शेतीकड वळण आवश्यक झाल आहे◾️





⬛{{बी बीयाण खते व कीटकनाशक कोणती वापरावी क}}⬛


🔶️आपल्या देशातील शेतकरी प्राचीन काळापासून बी बीयाण घरातील वापरत होता .कारण आपला भारतीय शेतकरी घरातील बीयाण वापरत होता .पण त्यामुळेच आपल्या देशात शेतकऱ्यांना उत्पादन अतिशय कमी प्रमाणात येत त्यामुळेच आपल्या देशातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच बियाण वापरन आवश्यक आहे कारण जर आपण बी बीयाण चांगल्या प्रतीच वापरल तर आपणास फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळत आहे.त्यामुळेच आपल्या देशातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच बीयाण वापराव .आता कस पीकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आळयाच प्रमाण वाढत आहे त्यामुळेच आपण त्या आळयाच्या नियंञणासाठी वेळेवर कीटकनाशकांचा फवारणी करण आवश्यक आहे .कारण आपण शेती जर फायदेशीर करायची ठरवली तर चांगल्या प्रतीच बी बीयाण व कीटकनाशक वापरण गरजेच आहे◾️


🔶️आपण कुठल खत वापरायच हे आपण आपल्या खत विकणाऱ्या दुकानदाराला जरी विचारल तरी आपणास हे समजत की कुठल्या पिकाला कुठल खत योग्य आहे .कारण आपण खत कुठल वापराव यासाठीच आपण शेतीला योग्य त्या खतांचा वापर केला पाहीजे खताची माञा कुठल्या पिकाला कीती द्यायची याचा पण आपण अभ्यास केला पाहीजे कारण रासायनिक खतांचा अतिवापर चांगला नाही ◾️




🟥{{जमीन व खतांचा वापर }}🟥

॥आपल्या देशात नदीच्या काठावर असलेल्या जमिनी सुपीक आहेत त्यामुळेच आपल्या देशातील काय काय भागात असलेली जमीन माळरानावरील आहे तर काय भागातील जमीनीत मात्र जमीन रेतीची जमीन आहे. पण   रेतीच्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. पण  तिच्यात पोषक द्रव्य अतीशय कमी प्रमाणात असतात त्यामुळेच अश्या जमिनीत आपण एखाद पीक घेतल तर त्या पीकाच उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत नाही .जर आपण एखादया पिकाची उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर आपणास खतांचा वापर करण आवश्यक आहे. शेणखत  ,कोंबडीखत,लेंडीखत, कंपोस्ट खत यांची आवश्यकता असते. बाजारातील खते अतिशय महागडी आहेत. ती खते गावात पुरेशा प्रमाणात उपलब्ध  होत नाहीत त्यामुळेच जमिनीचा पोत व उत्पादनात वाढ होत नाही .त्यामुळेच आपण जर आपल्या जमीनीचा पोत वाढवायचा असेल तर आपणास सेंद्रिय खतांशिवाय काहीही पर्याय नाही .कारण आपण जर कोंबडीखादय वापर केला तर आपल्या शेतीसाठी आपणास फार मोठ्या प्रमाणावर पाणी दयाव लागत .त्यामुळेच  आपण खत टाकण्या आदी जमीनीला ओली ठेवावी कारण जर जमीन ओली नसेल तर आपण खत टाकु नये कारण कोंबडी खादयात मोठ्या प्रमाणावर उष्णता असते त्यामुळेच खत टाकल्यावर किंवा टाकण्या॓आधी जमीन ओली असण आवश्यक आहे ◾️





⬛{{पाउस  व पीक उत्पादकता }}⬛

॥आपल्या देशात हा पाऊस हा सर्वञ पडतो.  पण काय काय वेळेला काय होत पाउस हा वेळेवर पडत नसल्यामुळेच आपल्या पीकाच नुकसान होत व याचा परिणाम हा उत्पादनावर होतो .कारण जर पाउस वेळेवर पडला तर आपल्या पिकाची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होते . काय काय वेळेस अस होत की पाउस एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडतो की महापूर येतो व महापूर आल्यामुळेच आपल्या पीकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत.त्यामुळेच उत्पादनात कमी प्रमाणात होते.त्यामुळेच पाउस आणी शेतीतील उत्पादन यावर समतोल साधता आला पाहीजे 🟥




{{उत्पादन खर्च कर्ज }}

॥जर आपल पीक चांगल झाल नाही तर त्याच उत्पादन ही कमी प्रमाणात मिळत. जर आपल उत्पादन कमी निघाल तर आपणास दुसर पीक करण्यासाठी आपल्याला बॅंकेतील कर्ज घ्याव लागत.त्यामुळेच आपणास शेतीतील खर्च व त्यापासून मिळणार उत्पादन याचा अभ्यास करून आपण शेतीतील उत्पादन वाढाव यासाठीच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहीजे नवनवीन प्रयोग केल्यावर आपणास शेतीची उत्पादन क्षमता वाढवता येईल.  आपण 
शेतीतील केलेला खर्च निघाला तर आपणास शेती परवडते नाहीतर आपली शेती ही फायदेशीर होत नाही .काय काय शेतकरी शेतीतील सर्व काम जस उस लागवड, पेरणी ,सार ओढणे अशी कामे काय काय शेतकरी घरच्या घरी करतात त्यामुळेच त्या शेतकऱ्यांना माञ शेतीवर जास्त प्रमाणात खर्च करावा लागत नाही .पण काय काय शेतकरी माञ शेतीत सर्व काम  मजुरांवर करतात त्यामुळेच त्यांना शेतीत  जास्त तोटा सहन करावा लागतो.शेती जर करायची असेल तर आपणास मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता लागते  त्यामुळेच जर आपण शेती ही जर एकत्र येऊन केली तर आपल उत्पादन वाढत जाईल. त्यामुळेच शेतकऱ्यांस मजूरावर अवलंबून रहाव लागणार नाही .त्यामुळेच आपण शेती करत असतानाच आपणास शेती व शेतीची उत्पादन याचा अभ्यास केला पाहीजे 🟨


  






Previous Post Next Post