ड्रॅगन फ्रुट शेती

 ((ड्रॅगन फ्रुट शेती))








ड्रॅगन फ्रुट शेती














::ड्रॅगन फ्रुट शेती अमेरिकेत केली जाते कारण आपल्या देशात या  फळाबददल माहीती माञ कोणाला नव्हती व याची लागवड करण्यासाठी कुठला शेतकरी तयार नव्हता पण जस जसा शेतीत बदल झाला  तसतसा या ड्रॅगन फ्रुट ची लागवड आपल्या भारतातील शेतकरी करू लागला आहे .कारण  ड्रगन फ्रुट हे फळ बऱ्याच आजारात गुणकारी अस फळ आहे व त्या फळाचा त्वचा  विकारात सुद्धा वापर करता येतो.   हे फळ तस पाहिल तर अमेरिकन वाळवंटात उगवणार  अस फळ आहे .या फळाला मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळेच या पिकाची लागवड आता भरपूर शेतकरी करतात. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ड्रॅगन फ्रुट ची शेती करत आहेत. महाराष्ट्र शासनाकडून ड्रॅगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठीच मदत करण्यात येते महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट साठी एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत अनुदान येत.लागवड करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो त्यामुळेच लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांस शासनाकडून अनुदान मिळत•





{{ड्रॅगन फ्रुट लागवड करताना जमीन कशी निवडावी }}

::ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी कशीही जमीन असली तरी चालेल कारण ड्रॅगन फ्रुट हे माळरानावर सुद्धा येत कारण त्या पिकाला पाणी फार कमी लागत नाही.त्यामुळेच हे पीक माळरानावर अगदी कमी पाण्यात सुद्धा उभा राहु शकत .आपण ड्रॅगन फ्रुट ची लागवड  माळरानावरील केली तर  आपण प्रथम ड्रीप हातरून घेण आवश्यक आहे कारण माळरानावरील पीकांना  पाणी हे जास्त प्रमाणात लागत नाही.त्यामुळेच ड्रिप करन आवश्यक आहे त्यामुळेच आपल्या शेतीला वेळेत पाणी देता येईल •







{{ड्रॅगन फ्रुट लागवड करत असताना येणारा खर्च }}

::ड्रॅगन फ्रुट लागवड करत  असतानाच येणारा खर्च हा फार मोठ्या प्रमाणावर आहे पण त्या पीकांना लागवड करण्यापूर्वी जो काही खर्च होणार आहे त्यावर शासनाकडून अनुदान दिल जात .ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी एक लोखंडी खांब लागतो व त्या खांबावर चार रोप लागतात जर आपण खांबाचा खर्च जरी 100 पकडला तरी एका रोपांची किंमत 70रू आहे तर एका एकरात आपणास ङांब आणी रोप अस  मिळुन दोन लाख रुपयांपर्यंत खर्च   येतो .आणी खत ही धरून सगळा खर्च तीन लाखापर्यंत येतो •


《ड्रॅगन फ्रुट ला मागणी 》

 ::ड्रॅगन फ्रुट ला मागणी प्रचंड प्रमाणात आहे .पण त्याचा उपयोग आपल्या  देशाएवजी बाहेर च्या देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे .कारण ड्रगन फ्रुट चा जरी फायदा असला तरी हे फळ महाग असल्यामुळेच  हे फळ विकत घेण गरिबाला परवडत नाही त्यामुळेच जर ड्रॅगन फ्रुट चा हमीभाव जर कमी केला तर विक्री करणारा सुद्धा त्याला कमी दरात विकु शकेल.  त्यामुळेच विकत घेणाऱ्या  ग्राहकाला सुद्धा ते परवडत. ड्रॅगन फ्रुट ची लागवड सध्या कमी  प्रमाणावर आहे•



{{ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी जमीन कशी असावी }}

 ::ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यासाठी जमीन ही पाण्याचा  निचरा होणारी असावी कारण जर जमीन काळी असेल तर त्या जमिनीला वापसा यायला वेळ लागतो व त्यामुळेच जी जमीन वाफसा     येणारी जमीन असेल ती जमीन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असते •



{{ड्रॅगन फ्रुट ला बाजारभाव किती असतो}}

::ड्रॅगन फ्रुट ला बाजारभाव सरासरी जर चांगला माल असेल तर 200रु किलो आणी कधी 80रू एवढा दर असतो •




 

{{ड्रॅगन फ्रुट साठी खत नियोजन }}

::ड्रॅगन फ्रुट साठी जास्त प्रमाणात खत वापरण्याची गरज नाही.  कारण  ड्रॅगन फ्रुट साठी शेणखत एका एकसाठी पाच ट्रेलर  .कीटकनाशक  आळवणी महीन्यातुन एकदा .फुल लागल्यावर 0 :52;34चा डोस देणे आवश्यक आहे .फूल लागल्यावर फळ सेटिंग होण्यासाठी फवारणी घ्यावी •



 





Previous Post Next Post