एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana
Ek Shetkari Ek DP Yojana॥एक शेतकरी एक डीपी योजना ॥
&महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत एक शेतकरी एक ट्रान्स्फरम या योजनेस मान्यता होती .
या योजनेंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ज्यांना लाइट चा प्रॉब्लेम आहे अश्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.
.त्यांना सारखी लाइट जाण्या येण्याच्या अडचणी मुळ पीकांना पाट पाणी देण्यास अतिशय ञास वाटायचा कारण लाइट च्या प्रॉब्लेम मुळ शेतकऱ्यांच पाट पाणी देण अतिशय कठीण अस बनल होत.
महाराष्ट्र शासनाच्या या एक डीपी एक शेतकरी योजना या योजनेंतर्गत आपल्या राज्यातील बहुतांश शेतकऱ्याना ट्रान्स्फरम बसवून मिळत आहेत.
त्यामुळेच त्यांची होणारी धावपळ थांबली आहे .शेतकऱ्यांच्या जीवनात फार मोठा बदल झाला आहे .कारण डीपी बसवल्यावर लाइट जाण्या येण्याच काही टेन्शन नाही .त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे .
&एक शेतकरी एक डीपी योजनेंमूळ जरी एखाद्या वेळेस शेतकऱ्यांना लाइट कमी जास्त झाली तर काही अडचण येत नाही कारण आपला स्वतंत्र ट्रान्स्फरम असला की लाइट कमी जास्त होण्याचा प्रश्नच नाही त्या ट्रान्स्फरम ला लागेल एवढाच विघुतभार त्याला सोडला जातो.Ek Shetkari Ek DP Yojana
त्यामुळेच आपण या ट्रान्स्फरम ला लाइट कमी जास्त होण्याचा प्रश्नच राहत नाही .परिणामी आपल्या रानातील मोटर कींवा स्टार्टर हे जळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .त्यामुळेच शेतकऱ्यांना शेतीला वेळेत पाणी मिळू लागले आहे त्यामुळेच शेतकरी आपल्या उत्पादनात वाढ भरपूर प्रमाणात करू लागला आहे.
Ek Shetkari Ek DP Yojana
॥एक शेतकरी एक डीपी योजना या योजनेचे फायदे॥
Ek Shetkari Ek DP Yojana
१)ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अश्या शेतकऱ्यांना प्रत्येक hp ,7000 रूपय द्यावे लागतील.
२)या योजनेमूळ बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे.
३)एखाद्या वेळेस जर ट्रान्स्फरम चालत जर घोटाळा झाला तर त्या ट्रान्स्फरम चा घोटाळा कोण काढणार याचा प्रश्न उद्भवतो पण आता एक डीपी एक ट्रान्स्फरम या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्स्फरम मिळत आहे. त्यामुळेच जर आपला स्वतंत्र ट्रान्स्फरम घोटाळा झाला तरी तो शेतकरी स्वतंत्र खर्चावर दुरूस्त करून आणतो.
४)एकञित असणार्या ट्रान्स्फरम च लाइट बील शेतकरी वेळेवर भरत नाहीत. त्यामुळेच शेतकयांच नुकसान होत व एकञित ट्रान्स्फरम चालत लाइट बील कोणी भरायच यासाठी लाइट बील तसेच राहते परिणामी वायरमन लाइट बंद करतात. त्यामुळेच स्वतंत्र ट्रान्स्फरम आल्यापासून शेतकरी आपले आलेले लाइट बील हे वेळेवर भरत आहे .त्यामुळेच त्यांच होणार नुकसान टळत आहे
५)एकञित ट्रान्स्फरम जर जळाला तर तो दुरूस्त करण्यासाठी वर्गणी करावी लागते .काय शेतकरी वर्गणी देतात पण काय शेतकरी वर्गणी देत नाहीत त्यामुळेच अश्या वेळेस त्या शेतकऱ्यांचे पैसे कोण भरणार हा प्रश्न उद्भवतो पण जर आपला स्वतंत्र ट्रान्स्फरम असेल तर आपणास काही अडचण येत नाही या योजनेमुळ शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्स्फरम मिळत. आहे .त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच ट्रान्स्फरम जरी जळाल तरी त्याला शासनाकडून ट्रान्स्फरम दुरूस्त करून मिळत. पण त्यासाठी लाइट बील भरणा झालेला असावा.
६)एकञित ट्रान्स्फरम वर कुठलेही शेतकरी आकडा टाकुन लाइट चालवतात .त्या शेतकऱ्यांना कोणीही आकडा का टाकला हे विसरू शकत नाही त्यामुळेच शेतकऱ्यांना ञास सहन करावा लागतो .त्यामुळेच जर आपला स्वतंत्र ट्रान्स्फरम असला तर आपण कुणालाही आकडा टाकुन देत नाही त्यामुळेच आपल्या पीकांच कुठलच नुकसान होत नाही .
७)या योजनेमूळ शेतकरी आपल्या स्वतंत्र दोन मोटारी अगदी आरामात चालवू शकतो व त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच भिजवन उरकत आहे.
८)या योजनेचा उद्देश हाच आहे की प्रत्येक शेतकरी हा लाइट च्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहीजे व प्रत्येक शेतकऱ्यांना लाइट ही मिळाली पाहिजे .त्यामुळेच त्या शेतकऱ्यांना लाइट साठी कुणावर अवलंबून रहाव लागणार नाही .परिणामी त्याच्या आयुष्यात मोठा बदल होइल व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल.
९)या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अश्याच शेतकऱ्यांना अर्ज करता येतो .त्यासाठीच शेतकऱ्यांकड सातबारा व आठ अ हा उतारा असण आवश्यक आहे .याशिवाय ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे .त्या शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड शी लिंक केलेला असावा.
Ek Shetkari Ek DP Yojana
॥एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र ॥
Ek Shetkari Ek DP Yojana
१)आधार कार्ड .
२)मोबाईल नंबर .
३)शेतीच सातबारा प्रमाणपत्र
४)बॅंक खाते क्रमांक
जर आपल्या काही शंका किवा काही अडचणी असतील तर आपण
आपल्या जवळच्या वीजकेंद्रात जाउन आपली तक्रार नोंदवून त्या तक्रारीच निरसन करून घेउ शकता.