शेतकरी हा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या जमिनीवर चालवलेला व्यवसाय म्हणजे शेती. शेती करण्यासाठीच शेतकऱ्यांना आपल्या रानात खूप मेहनत घ्यावी लागते .मिरची सारखी पिके किंवा उसशेती ,भातशेती ,पशुपालन, मत्स्य पालन, कोंबडी पालन, गहू शेती ,रेशीम शेती ,फूल शेती अशा विविध प्रकारची शेती केली जाते ..
..मिरची =मिरची या पिकाची लागवड करण्यापूर्वीच आपण प्रथम रान नांगरून घ्यावे त्यानंतर आपण रोटर च्या साहाय्याने रान रोटरून घ्यावे . नंतर आपण पावर ट्रेलर च्या साहाय्याने बेड सोडून घ्यावेत .बेड सोडून झाल्यावर त्या बेडवर लागवड करण्यापूर्वी आवश्यक ती खते बेडवर टाकून घ्यावीत नंतर आपण बेडवर मल्चिंग पेपर हातरून त्याच्यावर मिरची लागवड करून घ्यावी.मिरची लागवड केल्यावर तीन दिवसानंतर ह्यूमिक ॲसिड ची आळवणी करावी .आळवणी केल्यावर दहा दिवसात मिरचीसाठी कीटकनाशक फवारून घ्यावी .त्यामुळेच आपल्या पिकावर आधीचा प्रादुर्भाव होणार नाही .त्यानंतर 19;19;19 हे टानिक ड्रीपमधुन सोडून घ्यावेत. त्यानंतर 052:34हे खत मिरचीला फूले लागताना सोडले तर फूले भरपूर प्रमाणात येतात त्यामुळेच झाडाला मिरच्या जास्त लागतात व उत्पादनात वाढ होते..
.उसशेती=उस लागवड करण्यापूर्वीच पहिल्यांदा शेतीची मशागत करणे आवश्यक आहे .प्रथम आपण रानाची नांगरट करून घ्यावी .नंतर रोटर च्या साहाय्याने रोटर मारुन घ्यावे .नंतर सरी सोडून लागवड करून घ्यावी. उसशेती करण्यासाठी ड्रिप चा वापर करावा .कारण सध्या पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे .त्यामुळेच ड्रिप फायदेशीर आहे .ड्रिप च्या वापर करून आपण उत्पादनात भरपूर वाढ करू शकतो. ड्रिप मुळे आपला खर्च कमी होतो.
भातशेती=भातशेती ही प्रामुख्यान कोकणात केली जाते कारण कोकणात भात शेतीला पोषक असे वातावरण आहे .. भातशेतीला पाणी भरपूर प्रमाणात लागते त्यामुळेच भात शेती फक्त कोकणात केली जाते कारण कोकणात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळेच भात पिक या वातावरणात चांगले वाढते..
पशुपालन =पशुपालन हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय आहे.पशुपालन करताना आपण जर दुग्धव्यवसाय निवडला तर आपण जनावर पालन करू शकतो व त्यापासून मिळणाऱ्या दुधापासून तूप ,दही असे पदार्थ आपण बनवू शकतो.
मत्स्य पालन =मत्स्य पालन करत असताना आपण एक छोटासाच तलाव बांधून त्यात आणून मासे त्यात सोडले तर आपण मत्स्य पालन करू शकतो.मत्स्य पालन करत असताना आपण माश्यांसाठी आपण शिळे अन्न किंवा भात जरी टाकला तरी चालतो
कोंबडी पालन =कोंबडी पालन शेतीपूरक व्यवसाय आहे.कोंबङी पालन करत असताना आपण कोंबड्या साठी शेड उभारून घ्यावे.
रेशीम शेती=रेशीम शेती ही शेती पूरक व्यवसाय आहे.रेशीम उद्योग करत असताना प्रथम आपण तुतीच्या पानांची लागवड करावी .घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते. पट्टा पद्धतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात ३ एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षेपर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेऊन उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च. वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने ४५० टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील २४ दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या २४ दिवसांपैक सुरुवातीचे १० दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या १४ दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात २५ टक्के पर्यंत वाढ होईल. 22.शेतीमध्ये रेशीम कोशा शिवाय अवघ्या १४ दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते.
फूल शेती=फूल शेती हि अतिशय फायदेशीर आहे . फूलाला सर्वच फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.फुलाला बाहेर देशात फार मोठ्य प्रमाणावर मागणी आहे.
Got farming
[[शेती म्हणजे काय]]
शेती म्हणजेच ऐक असा उघोग ज्या उद्यापासून आपण अन्नाची गरज भागवू शकतो.
भारतीय शेतीची वैशिष्ट्ये (Characteristics of Indian Agriculture in Marathi)
उपजीविकेचे स्त्रोत:
आपल्या देशात शेती हा प्राथमिक उदरनिर्वाह चा स्रोत शेती आहे .आपल्या देशातील 70टक्के लोक शेतीवर उपजिविका करतात. आपल्याच देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.आपल्या देशातील शेतकरी वर्ग हा खूप कष्टाळू आहे आपण आपला देशातील शेतीला पर्याय व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय व मासेमारी या व्यवसायात वळू लागला आहे.
मान्सूनवर अवलंबून राहणे
बेरोजगारी
उत्पादनाच्या पारंपारिक पद्धती:
आपल्या देशात पारंपरिक शेती केली जाते. शेती आणि त्यात वापरण्यात येणारी साधने पारंपारिक आणि जुनी असल्याने प्रगत शेतीची कल्पना करता येत नाही.
कमी कृषी उत्पादन:
भारतीय शेतीचे उत्पादन कमी होते. फ्रान्स (७१.२ क्विंटल प्रति हेक्टर), ब्रिटन (८०.० क्विंटल प्रति हेक्टर) च्या तुलनेत, भारत प्रति हेक्टर अंदाजे २७ क्विंटल गहू उत्पादन करतो. एका कृषी कामगाराचे वार्षिक उत्पादन भारतात $१६२, नॉर्वेमध्ये $९७३ आणि युनायटेड स्टेट्समध्ये $२४०८ असा अंदाज आहे.
अन्न पिकांचे वर्चस्व:
गहू, तांदूळ आणि बाजरी यासह अन्न पिके सुमारे ७५% लागवडीखालील क्षेत्र व्यापतात, तर व्यावसायिक पिके सुमारे २५% लागवडीखालील क्षेत्र व्यापतात. या प्रक्रियेसाठी अकार्यक्षम शेती जबाबदार आहे.
शेतीचे प्रकार (Types of farming in Marathi)
जरी जगभरातील सर्वात सामान्य क्रियाकलापांपैकी एक कृषी आहे, परंतु ते ठिकाणानुसार बदलते. जगातील प्रमुख कृषी प्रकार येथे सूचीबद्ध आहेत.
पशुसंवर्धन:
या शेती पद्धतीत पशुसंवर्धनाला खूप महत्त्व दिले जाते. भटक्या विमुक्तांच्या विरोधात शेतकरी स्थिर जीवनशैली जगतात.
व्यावसायिक वृक्षारोपण:
या प्रकारची शेती अगदी लहान क्षेत्रात केली जात असली तरीही त्याच्या व्यावसायिक मूल्याच्या दृष्टीने लक्षणीय आहे. चहा, कॉफी, रबर आणि पाम तेलासह उष्णकटिबंधीय पिके ही या प्रकारच्या शेतीची मुख्य उत्पादने आहेत. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक प्रदेशात या प्रकारची शेती वाढली आहे.
भूमध्यसागरीय शेती:
भूमध्य प्रदेशातील असामान्य प्राणी आणि पीक संयोजन त्याच्या सामान्यतः कठोर वातावरणाचे प्रतिबिंबित करतात. या प्रदेशातील मुख्य पिके गहू आणि लिंबूवर्गीय फळे आहेत आणि मुख्य पशुधन हे लहान प्राणी आहेत.
प्राथमिक आसीन मशागत:
उदरनिर्वाहासाठी वापरल्या जाणार्या शेतीचा हा एक प्रकार आहे आणि तो इतर प्रकारांपेक्षा बदलतो कारण त्याच जमिनीचा तुकडा वर्षानुवर्षे सतत शेती केला जातो. हा दृष्टीकोन धान्य पिकांच्या व्यतिरिक्त काही वृक्ष पिकांची लागवड करण्यासाठी देखील वापरला जातो, जसे की रबरची झाडे आणि इतर.
दूध उत्पादन:
शेतीच्या या शैलीचा विस्तार दोन फायदेशीर घटकांमुळे होतो: बाजाराच्या जवळ असणे आणि समशीतोष्ण वातावरण. स्वीडन आणि डेन्मार्क सारख्या राष्ट्रांमध्ये या प्रकारची शेती पूर्ण क्षमतेने विकसित केली गेली आहे.
झुम लागवड:
दक्षिणपूर्व आशिया सारख्या उष्णकटिबंधीय भागात राहणारे लोक सामान्यत: या शैलीतील शेतीमध्ये गुंतलेले असतात, जे धान्य पिकांवर जोरदार भर देतात. पर्यावरणवादी दबावामुळे या प्रकारची शेती कमी झाली आहे.
व्यावसायिक तृणधान्याची लागवड:
शेतीच्या यांत्रिकीकरणाला प्रतिसाद म्हणून विकसित झालेली शेतीची ही पद्धत, कमी पाऊस आणि कमी लोक असलेल्या ठिकाणी प्राबल्य आहे. हवामान आणि कोरडेपणा यांचा या पिकांवर परिणाम होतो.