agriculture business idea ●गावात राहून करता येणारे व्यवसाय •
{{नमस्कार मिञानो आज आपण गावात राहून करता येणाऱ्या व्यवसायात बद्दल माहीती पाहूया}}
1)मशरूम शेती
2)दुग्धव्यवसाय
3)मत्स्यपालन
4)फळविक्री
5) भाजीपाला विक्री
6)गांडूळ खत प्रकल्प
7)कुक्कुटपालन
8)किराणा दुकान
9)इलेक्ट्रॉनिक दुकान
10)बॅक मिञ
11)औषधी दुकान
12)गिरणी व्यवसाय
13)वन औषधी व्यवसाय
14)चहा व्यवसाय
15) फुल विक्री व्यवसाय
■{{आता आपण या व्यवसाय ची सविस्तर माहीती पाहूया}}■
agriculture business idea
1)मशरूम शेती
●गावात राहून आपल्याला करता येणारा व्यवसाय म्हणजेच मशरूम शेती हाच आहे .कारण या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात फायदा आहे कारण ही एक नवीन कल्पना असेल कारण गावात हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो. मशरूम शेती आपण आपल्या गावाकडे करू शकतो व त्याची विक्री आपण आपल्या गावाच्या जवळील बाजारपेठेत करु शकतो .आणी त्यापासून चांगला नफा मिळतो•
2)दुग्धव्यवसाय
●आपण गावात राहून करता येणारा व्यवसाय म्हणजेच दुग्धव्यवसाय हा आहे .हा व्यवसाय करण्यासाठी आपण या व्यवसायाची सुरुवात करत असतानाच प्रथम एक किंवा दोन गाई घेऊन सुरुवात करावी कारण आपण जर दुग्धव्यवसायाची नवीन सुरुवात करत असाल तर आपण सुरुवात करत असतानाच एक किंवा दोन गाडीपासून करावी.गाईपालन करण्यासाठीच प्रथम आपण रानात चारा याची सोय करावी .आपण आपल्या रानात कडवळ किंवा मका यांची लागवड करून घ्यावी त्यानंतर त्यांची काढणीच्या वेळेस आपण मका या पीकाचा मुरघास करून घ्यावा त्यानंतर आपणास चाऱ्याची कमतरताच भासणार नाही .आपण गाई घेतल्यावर प्रथम तर आपण त्यांची योग्य अशी काळजी घेणे आवश्यक आहे .आपण जिथे गुर बांधत आहोत ती जागा नेहमीच स्वच्छ असावी .त्यामुळेच गुर आजारी पडणार नाहीत. गुरांना योग्य वेळी चारा पाणी देणे सुद्धा तेवढेच गरजेच आहे.सध्याच जनावरांना लम्पी सारखा आजार होताना दिसत आहेत हे आजार होऊ नयेत म्हणुन आपण जनावरांना वेळेवर लसीकरण करण गरजेच आहे.नाहीतर या आजाराने गुर दगावतात. त्यामुळेच त्यांची वेळेवर काळजी घ्यावी. .आपण आपल्या दुग्धव्यवसायात वाढ करायची असेल तर त्यांना वेळेवर चांगल्या प्रतीची पेंड देण आवश्यक आहे त्यामुळेच आपल्या दुध उत्पादनात वाढ होईल .त्यामुळेच गुरांची योग्य अशी काळजी घ्यावी. आपण आपल्या गुरांना वेळेवर धुतले पाहिजे नाहीतर त्यांना गोचीड चिकटण्याची शक्यता असते .आपण सुरुवात जरी दोन जनावरांवर केली तरी आपण हळू हळु जनावरांची संख्या वाढवून आपल्या दुध उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ करून चांगला नफा कमवू शकतो .सध्या बाजारात दुधाला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामुळेच दुधाला दरही चांगला मिळत आहे त्यामुळेच बरेच शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळू लागले आहेत•
3)मत्स्यपालन
●आपण गावात राहून करण्यासारखा व्यवसाय म्हणजेच मत्स्यपालन .मत्स्यपालन हा व्यवसायाला गावात फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे .कारण माश्यांचा वापर हा सर्वञ केला जातो.मत्स्यपालन करण्यासाठी आपण सुरुवातीला टाकीत किंवा शेततळयात मासे आणून सोडावेत. त्यानंतर आपण माश्याची चोरी होऊ नये म्हणून शेततळयाच्या कडेला लोखंडी तारेच कुंपण करून घ्याव.माश्यांना अन्न म्हणून आपण त्यांना आपल्या घरातील शिळे अन्न व भात देखील टाकू शकतो .त्यामुळेच त्यांच्यावर जास्त प्रमाणात खर्च होत नाही त्यामुळेच आपणास उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळत. जर आपले मासे मोठे झाले तर त्यांना खाण्यासाठी आपण लहान असे चीलापी मासे सोडु शकतो .मत्स्य पालन व्यवसाय करण्यासाठी आपणास शासनाकडून अनुदान मिळत त्यामुळेच आपणास मत्स्यपालन करत असतानाच कुठलीच अडचण येत नाही•
4)फळविक्री व्यवसाय
●फळविक्री व्यवसाय हा आपल्या गावात चालणारा हा ऐक व्यवसाय आहे.या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणावर पैसा कमवता येतो .हा व्यवसाय करताना आपण आपल्याच रानातील फळे विकून पैसे कमवू शकतो .जर आपणास पाहीजे तेवढा दर जर मिळत नसेल तर आपण रस्त्याच्या कडेला स्टाॅल लावून आपण जास्तीत जास्त नफा कमवू शकतो•
5)भाजीपाला विक्री
●भाजीपाला विक्री हा व्यवसाय गावात चालणारा व्यवसाय आहे याला गावात फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.आपण आपल्याच रानात बऱ्याच प्रकारचा भाजीपाला जसे की कांदा ,मिरची ,वांग, मेथी ,कोथिंबीर पालक अश्या प्रकारचा भाजीपाला आपल्या रानात लावून आपणास जशी मागणी येइल तसा भाजीपाला पुरवठा करता येतो.त्यामुळेच आपणास चांगल्या प्रकारच उत्पादन मिळत ,भाजीपाला विक्री आपण आठवड्याचा जो बाजार असतो त्या बाजारात जाऊन आपण आपला भाजीपाला विकू शकतो•
6)गांडूळखत प्रकल्प
●जमिनीचा पोत, उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे .यासाठी गांडूळ खताचा वापर महत्त्वाचा ठरतो .!!
{{खतनिर्मिती }}
●गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी तयार केलेल्या ढिगांमधून पाण्याचा योग्य निचरा सोबतच 40ते50टके ओलावा टिकावा याची काळजी घ्यावी.ढिगातील तापमान 20ते30अंश दरम्यान असावे.तसेच पूर्णवेळ सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. ढिगातील गांडूळांचे वाळवी, बेडूक, साप,मुंग्या ,गोम ,उंदीर यांच्यापासून संरक्षण करावे•
॥ खतासाठी ढीग तयार करण्याची पद्धत ॥
●सुरुवातीला ढिगाच्या बुडाशी 15 सेंटिमीटर जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा म्हणजेच गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन व तुरीचा पालापाचोळा यांचा थर करावा सेंद्रिय पदार्थांचा थरावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती 3:2प्रमाणात मिसळावी •
||गांडूळ खतांचे फायदे ||
●गांडूळ खतात नञ,स्फुरद,पाला तसेच दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात .जमिनीची उत्पादकता आणी पोतामध्ये सुधारणा होते.जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते ,धूप कमी होण्यास मदत होते.जमिनीतील गांडूळ खतांमूळे मातीच्या थरांची उलथापालथ होते.त्यामुळेच जमिनीत खोलवरील पिकांसाठी उपयुक्त आहे.जमिनीचा कस टिकून राहतो.उत्पादन क्षमतेसोबतच जमिन सुपीक होउन हवा खेळती राहते त्यामुळेच पिकांमध्ये पांढऱ्या मुळीची योग्य प्रकारे वाढ होते•
||गांडूळ खत निर्मिती ||
●पाण्यामध्ये शेण कालवून 10सेंटिमीटर जाडीची थर तयार करावा सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल कुजलेले अन्न गांडूळाला खाद्य म्हणून उपयुक्त राहील•
●शेवटी ढिगावर सेंद्रिय पदार्थांचे 15सेंटीमीटर जाडीचे आच्छादन करावे.आवश्यकतेनुसार दररोज किंवा दिवसाआड तयार झालेल्या ढिगावर पाणी शिंपडावे•
●साधारणतः एक ते दोन आठवड्यानी ढिगातील उष्णता कमी झाल्यावर त्यावरील सेंद्रिय पदार्थाचा थर बाजूला सारून गांडूळ सोडावी.गांडूळ सोडल्यावर पुन्हा सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन करावे,नियमित पाणी द्यावे गांडूळ खत निर्मितीसाठी जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो.उत्तम प्रतीच्या गांडूळ खतांचा रंग काळसर चहा पावडर सारखा झाल्यावर गांडूळ खत तयार होते.गांडूळ खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे•
7)कुक्कुटपालन
●कुक्कुटपालन पालन करत असताना शेतकऱ्यांनी मुक्त संचार पद्धतीन कुक्कुटपालन केल्यावर अनेक फायदे होतात. मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन पालन केल्यास आपण 50 किंवा त्यापेक्षा अधिक पक्षी सांभाळून घेता येतात. कमीत कमी भांडवल लावून आपण जास्तीत जास्त कमाई करता येते .सुरूवात जर आपणास करायची असेल तर एक दिवसाची पिल्ले खरेदी करून सुरुवात करू शकतो.कोंबडया मोकळ्या सोडल्यावर त्यांचा पालन करण्याचा खर्च कमी होतो .कोंबड्या मुक्त संचार असेल तर त्या निरोगी राहतात !!
agriculture business idea
[[मुक्त संचार पद्धतीन कुक्कुटपालन पालन करण्याचे फायदे]]
1)जर मुक्त पद्धतीन आपण कुक्कुटपालन केले तर आपण खादयावरील खर्च कमी करू शकतो जर मुक्त वावर असेल तर आपण कोंबड्यांना शिळे अन्न हे देखील देउ शकतो आणी सांडलेले अन्न खाऊन देखील कोंबड्या आपले जीवन जगू शकतात. फक्त त्यांचे आपणास कुञ, कोल्हयापासून आपणास रक्षण करावे लागते.
2)गावरान कोंबड्या ह्या आपले अन्न स्वतःचाच शोधून स्वतःच पोट भरू शकतात .हे पक्षी सगळीकडेच किडे ,टाकाऊ अन्न खाऊन जगतात.
3)मुक्त संचार पद्धतीन कुक्कुटपालन केले तर राञी निवारा यासाठीच शेडमधये येतात .
[[नियोजन ]]
agriculture business idea
[[जर आपण अंडी उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून कुक्कुटपालन करण्याचा विचार करत असेल तर आपण पण गावरान पक्षी सांभाळ करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. गावरान पक्षी उत्पादन घेण्यासाठी फार चांगले असतात कारण गावरान पक्षी हे निरोगी असतात . जर आपण योग्य नियोजन केले तर आपल्या पक्षांची वाढ देखील चांगली होते व त्याना विक्रीसाठी द8र चांगला मिळतो!!
8)किराणा दुकान
●किराणा दुकान हा व्यवसाय गावात चालणारा एक महत्वपूर्ण व्यवसाय आहे. कारण गावातील लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू म्हणजेच साखर, चहा,शेंगदाणा,तेल असे पदार्थ किराणा दुकानात मिळतात त्यामुळेच जर आपण गावात दुकान टाकल तर गावातील लोक आपल्याकडून किराणामाल नेतील व त्यामुळेच आपला व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालेल व आपल्याला नफा मोठ्या प्रमाणावर मिळेल•
9)इलेक्ट्रॉनिक दुकान
●इलेक्ट्रॉनिक दुकान हा व्यवसाय गावात चालणारच महत्वपूर्ण असा व्यवसाय आहे .कारण इलेक्ट्रॉनिक च्या वस्तू या गावात मिळत नाहीत अश्या वस्तूंसाठी गावातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते .जर आपण गावात इलेक्ट्रॉनिक दुकान चालू केल तर गावातील लोक बाहेर जाणार नाहीच व सगळे लोक आपल्या दुकानात इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करतील त्यामुळेच आपला न फा मोठ्या प्रमाणावर होइल व त्याचबरोबर आपण सबमसिॅबल मोटर, स्टार्टर, केबल अश्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी ठेवू शकतो •
10)बॅक मिञ
●पैसे कमावण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली ऑफर आलीये. प्रधानमंत्री जनधन योजनेशी जोडले जाऊन अर्थाच बँक मित्र बनून तुम्ही महिन्याा पैसे कमवू शकता. बँक मित्रला कमीत कमी पाच हजार रुपयांचे फिक्स वेतन मिळते. याशिवाय खात्यांच्या देवाणघेवाणीवर वेगळे कमिशनही मिळणार. याशिवाय बँक मित्रासाठी एक वेगळी कर्जाची स्कीमही तयार करण्यात आलीये. यात कम्प्युटर, वाहनसाठी कर्जंही बँक देईल. आपण कुठल्याही बॅकेच बॅक मिञ म्हणून काम करू शकतो जसे स्टेट बॅंक ,बॅंक ऑफ इंडिया,पंजाब नॅशनल बँक ,बॅंक ऑफ बडोदा अश्या प्रकारे कुठल्याही बॅंकेेच बॅंक मिञ म्हणून काम करता येतो•
11)औषधी दुकान
●औषधी दुकान हा व्यवसाय गावात चालणारा महत्त्वपूर्ण असा व्यवसाय आहे .त्यामुळेच या व्यवसायाला गावात फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे .औषधी दुकानात आपण पीकांना लागणारी वेगवेगळी खत, कीटकनाशक औषधी दुकानात आपणास खरेदी करता येतात .त्याचबरोबर आपण औषधाबरोबरच आपण बी बीयाण देखील आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवू शकतो.
12)गिरणी व्यवसाय
●गिरणी व्यवसाय हा गावात चालणारच महत्वपूर्ण असा व्यवसाय आहे .कारण या व्यवसायाला गावात फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे .गावातील लोक दळण देण्यासाठी एका गावातून दुसर्या गावात जातात जर आपण आपल्या गावात गिरण व्यवसाय चालू केला तर त्याला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.कारण पॅकिग मधील आटा विकत घेण हे प्रत्येक लोकांना परवडेल अस नाही त्यामुळेच गिरणीत जाउन दळण दळणे हाच पर्याय आहे त्यामुळेच या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आपण जर हा व्यवसाय गावात चालू केला तर आपणास फार मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल•
13)वन औषधी व्यवसाय
वन औषधी व्यवसाय हा गावात राहून चालणारा व्यवसाय आहे कारण गावात दवाखान्याच्या सुविधा फार कमी प्रमाणात आहेत
त्यामुळेच वन औषधी चे महत्व वाढले आहे .वन औषधी खालील प्रमाण
1)सर्पगंधा
या वनस्पतिचा वापर सर्पदंश झाल्यावर करता येतो .
2)तुळस
ही वनस्पति चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पति आहे या वनस्पतीला फार महत्त्वपूर्ण स्थान आहे .तुळस ही दारात असावी त्यामुळेच घरातील माणस कमी आजारी पडतात.
14)चहा व्यवसाय
●चहा व्यवसाय हा व्यवसाय गावात चालणारा एक महत्वपूर्ण व्यवसाय आहे .या व्यवसायाला गावात फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे .कारण चहा व्यवसाय करायला भांडवल फार मोठ्या प्रमाणावर लागत नाही
15)फुल विक्री व्यवसाय
फुल विक्री व्यवसाय हा व्यवसाय गावात राहून चालणार व्यवसाय आहे.फुल विक्री व्यवसाय हा गावात आपण रस्त्याच्या कडेला एक छोटासाच स्टाॅल लावून आपण फुल विक्री व्यवसाय करू शकतो.