Posts

Showing posts with the label हवामान अंदाज

हवामान अंदाज

  राज्यात सुमारे दोन आठवड्यांपासून दडी मारणाऱ्या पावसाला सुरूवात झाली आहे. पाहूया आजचा हवामान अंदाज महाराष्ट्र !! राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्या कोकण ,  विदर्भात  बहुतांशी ठिकाणी, तर  मराठवाडा , मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरामध्ये ३.१ किलोमीटर ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात मंगळवारी ता.१७ तारखेला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात बुधवारपर्यंत (ता. १८) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  आजचा हवामान अंदाज कोकण विभाग कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, इत्यादी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान अंदाज मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगल...