शेती काळाची गरज
शेती ही काळाची गरज आहे . कारण आपल्याला कच्चा माल हा शेतीपासून मिळतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे . येथील बरेच उद्योग शेतीवर अवलंबून आहेत 1)साखर निर्मिती उद्योग = साखर उद्योग हा सुद्धा शेतीवर आधारित आधारित उद्योग आहे .कारण साखर निर्मीती साठी ऊस लागतो व उसापासून साखर निर्मिती होते .इथेनॉल हे सुद्धा उसापासून तयार करता येते .इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे याचा पेट्रोल मधे मिक्स करुन इंधन म्हणून वापर करता येतो 2)उसापासून आपणास गूळ तयार करता येतो .त्यासाठी प्रथम उसाच्या शेतात जाऊन त्याची गुणवत्ता तपासली जाते. ज्या उसाची रिकवरी 21 ते22 आहे असा उस निवडला जातो त्या उसाला 10ते11 महीने पूर्ण व्हावे लागतात .त्यामुळे उसाला चांगलाच दर मिळतो उसाच्या गुणवत्तेत व वजनात होणारी घट टाळली जाते .उसाच्या अनेक जातीपैकी गुणवत्तापूर्ण अशी एक जात निवडली जाते शिवाय अशा गुणवत्तापूर्ण उसापासून बनवलेल्या गुळाला आकर्षक रंग...