पीक विमा
खरीप 2024.1 रुपयात पिक विमा- सर्वसमावेशक पिक विमा योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 1.या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत - सन 2023-24 पासून शेतकरी यांना केवळ १ रु. भरुन पिक विमा काढता येईल. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छीक स्वरुपाची आहे. खातेदारा व्यतिरीक्त कुळाने अगर भादेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत सहभागी होवू शकतात. या योजनेत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण मिळते. ही योजना राबविण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांचे १२ समूह करण्यात आहेत. या जिल्ह्यांच्या समूहासाठी एक विमा कंपनी नेमण्यात आलेली आहे. या वर्षापासून या योजने मध्ये एक महत्वा चा बदल करण्यात आलेला आहे तो म्ह णजे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही या वर्षी कप अँड कॅप मॉडेल (८०:११०) नुसार राबविण्यात येणार आहे. यामध्ये एकूण जमा विमा हप्त्याच्या २० टक्के पेक्षा जास्त रक्कम विमा कंपन्यांना स्वतःकडे ठेवता येणार नाही. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिल्यानंतर उरलेली २० टक्के पेक्षा जास्तीची रक्कम विमा कंपनी राज्य शासना...