गांडूळखत निर्मिती
जमिनीचा पोत, उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे .यासाठी गांडूळ खताचा वापर महत्त्वाचा ठरतो .!! खतनिर्मिती गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी तयार केलेल्या ढिगांमधून पाण्याचा योग्य निचरा सोबतच 40ते50टके ओलावा टिकावा याची काळजी घ्यावी.ढिगातील तापमान 20ते30अंश दरम्यान असावे.तसेच पूर्णवेळ सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. ढिगातील गांडूळांचे वाळवी, बेडूक, साप,मुंग्या ,गोम ,उंदीर यांच्यापासून संरक्षण करावे. खतासाठी ढीग तयार करण्याची पद्धत सुरुवातीला ढिगाच्या बुडाशी 15 सेंटिमीटर जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा म्हणजेच गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन व तुरीचा पालापाचोळा यांचा थर करावा सेंद्रिय पदार्थांचा थरावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती 3:2प्रमाणात मिसळावी गांडूळ खतांचे फायदे गांडूळ खतात नञ,स्फुरद,पाला तसेच दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात .जमिनीची उत्पा...