अल्प भूधारक शेतकरी योजना
अल्प भूधारक शेतकरी
भारत हा देश शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जाणारा देश आहे.कारण आपल्या देशातील 70टक्के लोकसंख्या शेती करते.भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो .कारण आपल्याच देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे .आपल्या देशातील बरेच असे शेतकरी आहेत त्यांच्याकडे अतिशय कमी जमीन आहे.ज्या शेतकऱ्यांकड जमीन अतिशय कमी असेल त्या शेतकऱ्यांच जीवनमान अतिशय संघर्षाच जीवन असत .
अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या समोर असणारी आव्हान
अल्प भूधारक शेतकरी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकड जमीन अतिशय कमी आहे त्या शेतकऱ्यांना अल्प भूधारक शेतकरी म्हणतात. अल्प भूधारक शेतकऱ्यांकड जमीन अतिशय कमी असल्यामुळेच त्याच उत्पादन अतिशय कमी असत .सध्या वाढती महागाई खतांच्या वाढत्या किंमती यामुळेच अल्प भूधारक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत आहे.अल्प भूधारक शेतकऱ्यांच आधीच उत्पादन कमी त्यात त्या शेतकऱ्यांवर आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी घ्यावी लागते .त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असेल किंवा घरातील एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर त्याची धावपळ होते .कारण त्यांच्याकड जमीन अतिशय कमी ,उत्पादन कमी त्यामुळेच त्यांची परिस्थितीती अतिशय नाजूक अश्या कठीण परिस्थितीत त्याला अल्पशा जमिनीवर कर्ज सुद्धा कोण देत नाही
अल्प भूधारक शेतकरी योजना उद्दिष्ट
अल्प भूधारक शेतकरी योजनेच उद्दिष्ट हे आहे की लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे जेणेकरून तो आपली शेतीची कामे चांगल्या प्रकारे करू शकतील.
ही योजना शेतीत येणारी नवनवीन उपकरण याबाबत शेतकऱ्यांना माहीती मिळावी .त्यामुळेच शेतकरी त्या नवनवीन उपकरणाचा वापर करून आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीतील नववीन अद्यावत टेक्नॉलॉजी चा वापर करून आपल्या उत्पादनात कशी वाढ करता येईल हे यामाध्यमातून शिकता येईल
अल्प भूधारक शेतकरी योजना
1)ट्रॅक्टर अनुदान योजना=भारत हा कृषिप्रधान देश आहे. . भारतीय शेती यांञिकीकरण वापर वाढावा या उद्देशानेच शासनाकडून नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात
आपल्या देशात बऱ्याच लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.त्यातील काही शेतकऱ्यांकड अतिशय कमी जमीन आहे त्यामुळेच अश्या शेतकऱ्यांना शेतीच एखाद अवजार जर खरेदी करायच असेल तर ते शक्य होत नाही. त्यामुळेच अश्या अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ट्रॅक्टर साठी अनुदान देण्यात येत.
याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांन जुन्या पारंपारिक पद्धतीन शेती करण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी.त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.
जर शेतकऱ्यांन यांञिकीकरणाचा वापर केला तर शेतकऱ्यांची शेतीतील मेहनत कमी होईल व रानातील काम जलद गतीने होतील .
2)कुक्कुटपालन
आपल्या राज्यात बरेच असे बेरोजगार असणारे तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठीच महाराष्ट्र शासनाकडून कुक्कुटपालन करण्यासाठी अनुदान देत आहे .कुक्कुटपालन करण्यासाठीच आपल्या महाराष्ट्र शासनाकडून 75टक्के अनुदान देण्यात येत. तरी 1लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत. आपल्या राज्यातील लोक बरेचसे नागरिक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपड करत असतात .
अश्या तरुणासाठी कुक्कुटपालन योजना ही एक चांगली योजना आहे .कुक्कुटपालन केल्यावर तरुणाला त्यामार्फत रोजगार उपलब्ध होईल.