गहु शेती
[[गहू लागवडीविषयी माहीती]]
||महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या पीकापैकी गहु हे ऐक पीक आहे .गहू हे पीक कुठल्याही रानात घेता येते .जरी रान जिरायत असेल तरी चालेल आणी बागायती असेल तरी चालेल. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हा गहू या पिकाची पेरणी करतो .गहू लागवड करण्यासाठी आपण प्रथम रानाची नांगरट करून घ्यावी व नंतर आपण रोटर च्या साहाय्याने आपले रान रोटरून घ्यावे. नंतर आपण 10;26;26 हे खत आपण रानात टाकुन घ्यावे त्यानंतर गहू टाकुन घ्यावा आणी ट्रॅक्टर च्या साहाय्याने सारे सोडुन घ्यावेत त्यानंतर आपण सारे नीट ओढुन घ्यावेत त्यामुळेच आपणास पाणी देताना ञास होणार नाही .जर आपण जर गहू लागवड करत असताना जर 10:26;26चा वापर केला तर गव्हाची उगवण चांगल्या प्रमाणावर होते .त्यामुळेच पीकाची वाढ देखील अतिशय जोमदार होईल व आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल. गहू लागवड केल्यावर जर जमीनीत ओलावा नसेल तर पाणी लगेच देउन घ्यावे त्यामुळेच आपल्या गव्हाची उगवण लवकर होईल. पहील पाणी दिल्यावर जरी पीकात तन दिसत असेल तरी 21 दिवस झाल्याशिवाय कुठलेही तननाशक फवारू नका.गहू या पिकावर तांबेरा पडण्याची शक्यता असते त्यामुळेच आपण गव्हाची उगवण झाल्यावर लगेच आपण कीटकनाशकाची फवारणी करण आवश्यक आहे ●
||हवामान ||
||गहू या पीकाला थंड व कोरडे आणी स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल हवामान ●
||गहू लागवड करण्यासाठी बियाण किती लागत||
||गहू लागवड करण्यासाठी बियाण प्रती एकर 40 किलो बियाण लागत.बियाण निवडत असताना चांगल्या प्रतीच बियाण निवडाव●
||गहू लागवड करण्यासाठी जमीन कशी असावी ||
||गहू लागवड करण्यासाठी जमीन ही कुठलीही चालते. पण जमीन ही पाण्याचा निचरा करणारी असावी कारण जास्त पाणी गव्हाला चालत नाही .त्यामुळेच योग्य तेवढेच पाणी द्यावे .जर जमीन काळी असेल तर चार ते पाच पाण्यात गहू निघतो.जर जमीन मुरमाड असेल तर थोड पाणी जास्त लागत . त्यामुळेच गहू हा कुठल्याही जमिनीवर चांगल्या प्रमाणात गहू उत्पादन निघत●
||गहू खत नियोजन ||
||गहू पेरत असताना आपल्याला 10;26;26 एकरी दोन पोत टाकुन घ्याव म्हणजेच आपल्या गव्हाची उगवण चांगली होइल. त्यानंतर 20 दिवसानंतर गव्हाला एकरी 1युरिया टाकून पाणी दयाव त्यामुळेच आपल्या गव्हाची वाढ चांगली होणार आहे .तिसरी खताची माञा आपण गव्हाला चाळीस दिवस झाल्यावर 25किलो युरिया10किलो झिंक सल्फेट टाकुन पाणी द्यावे .झिंक सल्फेट मुळे आपल्या गव्हाची लोंबी ची उंची वाढणार आहे.त्यामुळेच आपले उत्पादन वाढणार आहे●