ऊस तोड कामगार व्यथा

[[ उस तोड कामगार व्यथा ]]

उस

//आपल्या देशातील ऊस तोङ कामगार  सर्वात कष्टप्रद जीवन व्यतीत करणारा असा वर्ग आहे .कारण आपल्याच देशातील काही गाव बीड ,जामखेड, पैठण अश्या गावातील लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठीच आपल्या घरादारापासुन दुर रोजगारासाठी निघुन जातात.त्यांचा प्रमुख व्यवसाय हा उसतोड करणे हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे .


//कारण तेथील भागात जरी जमीनी जरी चांगल्याच असल्या तरी तेथे पावसाचे प्रमाण अतिशय अल्प असे आहे .कारण तेथे अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडतो.


 //त्यामुळेच तेथे फक्त ज्वारी किंवा बाजरी सारखी दोन पीक निघतात त्यामुळेच तेथील लोकांना चार महीने रोजगार नसतो.  तेथील लोक काही ना काही काम शोधत असतात त्यातील काहीजण उसतोडणीच काम करतात. काहीजण कलर काम करण्यासाठी मोठ मोठ्या शहरात जातात. काहीजण घर सांभाळण्यासाठी घरीच राहतात. 


//त्यामुळेच उस कामगार आपला परिवार चालवण्यासाठी आपल गाव सोडून ईतर राज्यात जातात त्यामुळेच त्यांच्या मुलांना असुरक्षित अश्या ठिकाणी जातात त्यामुळेच त्या मुलांच्या शिक्षण व आरोग्याची गैरसोय होते .जर एखाद्या वेळेस जर कुठला अपघात झाला तर त्यांना वेळेवर उपचार घेता येत नाहीत. उसतोड कामगार प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी उसतोड करण्यासाठी जातात त्यामुळेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होते.त्यामुळेच त्यांना मुलांना चांगल्या प्रकारच शिक्षण घेता येत नाही त्यामुळेच त्यांची मुले ही शिक्षणापासून लांब राहतात. 





उस

[[उसतोड कामगारांच्या समस्या]]



//उसतोड कामगार हे आपले गाव सोडून दुसर्‍या गावात उदरनिर्वाह करण्यासाठीच निघुन जातात त्यामुळेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होत नाही .उसतोड कामगार यांच जीवन सतत या गावाहून त्या गावात प्रत्येक वर्षी कामासाठी फिराव लागत त्यामुळेच त्यांच्या मुलांना एका ठिकाणी शिक्षण घेता येत नाही म्हणून ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत त्यामुळेच त्यांच्या मुलांना शिक्षणाच महत्त्व काय आहे ते कळत नाही .


//कारण ती मुले जर शिकली तर ते आपली आर्थिक स्थितीत सुधारणा करू शकतील .उसतोड कामगार आपल्या गावाहून परगावात ज्या वेळेस उसतोड करण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांना तेथे राहण्यासाठी मोठा ञास सहन करावा लागतो कारण तेथील लोक ते त्यांना सारखा ञास देतात .त्यांना तिथे गेल्यावर आपल्या पिण्याच्या पाण्याची सोय प्रथम करावी लागते .कारण जर त्यांना त्या गावात पिण्यायोग्य असे पाणी मिळाले तर ते तिथे राहू शकतात .


//तिथे राहिल्यावर एक छोट्याश्या झोपडीत  आपला संसार थाटतात जर एखाद्या वेळी मोठ्या प्रमाणावर पाउस झाला तर त्यांना फार मोठा ञास सहन करावा लागतो .उसतोड कामगार ज्या वेळेस उसतोड करण्यासाठी जातात त्यावेळेस ते आपल्या मुलांचा विचार न करता तशीच उसतोड करतात त्यामुळेच त्या मुलांनी वेळेवर जेवन केल की नाही याचा सुद्धा विचार ते करत नाहीत.

//कारण तेवढा वेळ ते आपल्या मुलांना देउ शकत नाहीत त्यामुळेच ती मुल कुपोषित अशीच राहतात .उसतोड कामगार हा ज्या ठीकाणी राहतात त्या ठिकाणाहून ईतरञ एक ते दोन किलोमीटर अंतरावर त्यांना उसतोड करण्यासाठी जाव लागत त्यामुळेच त्यांना सकाळी 4वाजता उठून आपल्या कामाला लागाव लागत तर ते सकाळी सकाळी लवकर उसतोड करण्यासाठी जाउ शकतात.

//प्रथम पुरूष मंडळी उसतोड करण्यासाठी निघुन जातात. नंतर बायामाणस आपल्या घरातील काम आटोपून उसतोड करण्यासाठी जातात. जाताना ते आपल्या लहान मुलांना ताटात अन्न वाढुन जातात त्यांनी जेवण  केलय की नाही याची माहीती त्यांना नसते. 



//सध्या उसतोड कामगाराची स्थिती ही काय चांगली नाही.  कारण त्यांना उघड्यावर झोपाव लागत .ऊसतोड कामगाराला मालक काही पैसे उचल म्हणून देत असतो.त्या मालकांकडून घेतलेले पैसे फेडण्यासाठी कष्ट कराव लागत.उस तोड कामगार जरी उसतोड सकाळी करत असला तरी त्याला उस भरणी माञ कधीही राञी अपराञी करावी लागते.


//कारण कारखान्यात ऊस भरून गेलेला ट्रॅक्टर परत कधी येईल याची खात्री नसते त्यामुळेच ज्या वेळेस ट्रॅक्टर कारखान्यात ऊस  खाली करून येईल त्यावेळेस उसतोड कामगारांना उस भरावा लागतो. कारण उस भरताना त्यांना काहीही होऊ शकत त्यामुळेच त्यांचा विमा असण गरजेच आहे कारण जर एखाद्या ऊस तोड कामगाराचा जर आपघात झाला तर त्यांचे सर्व कुटुंब रस्त्यावर येत त्यामुळेच उसतोड कामगाराचा विमा असण आवश्यक आहे.



//ऊस तोड कामगार कधीही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो .कारण जर एखाद्या वेळेस राञी जर ट्रॅक्टर भरायचा असेल तर त्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता उस ट्रॅक्टर मध्ये भरण्याच काम उसतोड कामगार करत असतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी विमा असण गरजेच आहे .जरी एखाद्या वेळेस काही आपघात झाला तर त्या विम्याचा उपयोग त्या माणसाला होतो.

 


//उसतोड करण ही काय सोपी गोष्ट नाही कारण ऊसतोड करताना अनेक अडचणी असतात. कारण उसतोड करत असताना कामगार आपली मूल अशीच सोडून  देतात.  त्या लहान मुलांनी वेळेवर जेवन केल की नाही याची माहीती सुद्धा त्यांना  नसते. 




//उसतोड कामगार आपले गाव घरदार सोडून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी इतर गावात जातात.  त्यामुळेच  त्यांच्या घरी एखाद्या वेळेस काही अडचण आली तर कोणी नसत .उसतोड कामगार ऊसतोड करण्यासाठी गेल्यावर कुठेतरी माळावर राहतात व आपली  छोटीशीच एक झोपडी तयार करतात .तिथेच त्यांच सर्व सामान असत .त्यांना पाउस, ऊन ,वारा याची चिंता न करता उसतोड कामगार आपल कष्ट करत असतो.कारण उसतोड कामगारासारख राबणारा व आपल्या जीवनच रान करणारा अस दुसर कोणी करू शकत नाही.




//उसतोड कामगाराला जर एखाद्या वेळेस काही मोठी अडचण जर आली तर त्यांच्या जवळ अस कोणी नसत .त्यांना एखाद्या वेळेस आरोग्य सेवेची गरज जर पडली तर त्या मुलांना दवाखान्यात न्यायची जर गरज पडली तर त्यांना जाण्यासाठी गाडी मिळत नाही .



उस




शेतातील उस कारखान्यात नेणारा एक  स्थलांतरित मजुरांचा समुदाय  निर्माण होत गेला तो समुदाय  म्हणजेच उसतोड 





उसतोड कामगार हे कोरडवाहू जमीनीचे मालक असतात, दुष्काळ हे त्यांच्यात वर्षानुवर्षापासुन चालत आलेला आहे,त्यांच्या घरातील शिक्षण जेमतेम त्यामुळेच    जेवढे जास्त कोयते तेवढाच जास्त पगार त्यांना मिळत होता .जेवढी कुटुंबातील लोकांना तोडीसाठी जास्त तेवढा जास्त त्यांना पगार मिळतो .जर काही गरज वाटली तर ते मालकांकडून उचल घेतात ती उचल फेडण्यासाठी वर्षानुवर्षे 










Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming