भारतीय शेतकरी

  [[भारतीय शेतकरी]]

 ●आपल्या देशातील 70टक्के लोक शेती करतात व आपल्या देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे .आपल्या देशाला शेतीसाठी पोषक असे वातावरण मिळाल आहे.

 त्यामुळेच आपल्या देशात शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते .कारण शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

 .आपल्या देशातील शेतकरी जरी गरीब असला तरी  तो कष्टाळू असा  शेतकरी आहे तरीपण आपल्या देशात शेतकरी गरिबत जीवन जगत आहे कारण जरी पिकवणारा शेतकरी असला तरी मधली जी साखळी आहे ती शेतकरी नाही .आणी त्यामुळेच शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समजुन घ्यायला कोणी तयार नाही. 

आपल्या देशातील शेतकऱ्यांना कधी पुर तर कधी पुरामूळ आलेल्या नापिकी ला सामोर जाव लागत त्यामुळेच आपल्या देशातील तरुण पिढी शेतीकड वळण नाही जरी एखाद्या शेतकऱ्यांकड भरपूर शेती जरी असली तरी त्या घरातील मुल शेती करायला तयार होत नाहीत. 

.कारण त्यांना आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती माहित असते. त्यामुळेच तरुण पिढी शेती करण्यास तयार होत नाही आणी जरी शिकलेला एखादा मुलगा जर शेती करू लागला तर आपल्या समाजातील माणस त्याला नाव ठेवतात कारण एवढ शिकून सुद्धा तु शेती करतो त्यामुळेच मुल शेती करण्यापेक्षा नोकरी करण पसंत करतात.

पण जर सुशिक्षित आपल्या लोकांनी जर सपोर्ट जर केला तर तो मुलगा शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीत नवीन क्रांती घडवून आणू शकतो .भारतातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर मेहनत करून शेतीत उत्पादन घेतो  .




[[भारतीय शेतीतील नववीन बदल]]

●भारतातील लोक हे आपली शेती ही जुनाट पद्धतीन करत होते त्यामुळेच त्यांना हव असलेल उत्पादन मात्र मिळत नव्हत .पण आता बदलत्या काळानुसार शेतकरी आपल्या शेतीत बदल करू लागला आहे. 

. त्यामुळेच भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा झाली आहे .जुन्या काळात भारतीय शेतकरी पाट पाण्यावर आपली शेती करत होता पण आता  मात्र भारतात ड्रिप च्या माध्यमातून शेती केली जाते .

कारण  ड्रीप मधुन आपण पिकासाठी आवश्यक असणारी अन्न द्रव्य ड्रीप च्या माध्यमातून देता येतात.  त्यामुळेच  ड्रीप फायदेशीर ठरते .ड्रीप मुळ आपल्या पाण्याची बचत होते व पीक कमी पाण्यात जोमदार असे पीक येते .

ड्रीप असल्यामुळेच आपण पाणी पीकांना वेळेवर लागेल एवढे पाणी देऊ शकतो .भारतीय शेतीमध्ये आता पाॅली हाउस उभा करून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकवून शेतकरी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेत  आहे .

आपल्या देशातील शेतकरी फुलशेती पिकवून सुद्धा आपल्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहे .कारण फुलांना बाहेरच्या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी आहे .

त्यामुळेच आपल्या देशातील शेतकरी वेगवेगळ्या प्रकार ची फुल जसे की सुर्यफूल =सुर्यफूलापासुन सुर्यफूल तेल तयार होते व हे तेल खाद्य तेल म्हणून वापरतात त्यामुळेच सुर्यफूलाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी आहे .

●गुलाब =गुलाबाचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो जसे की गुलकंद बनविण्यासाठी  ,एखाद्या व्यक्तीस शुभेच्छा देण्यासाठी किंवा लग्न समारंभात. 


●झेंडू=या फुलाचा उपयोग हार बनविण्यासाठी होतो .कुठलेही लग्न समारंभ असुदया तिथे सुद्धा झेंडू चा वापर केला जातो .





[[फळशेती]]


लिंबू=हे फळ हे माळरानावर येणार अस फळ आहे या फळाचा उपयोग रोजच्या जेवणात जर वापर केला तर अन्न पचन  नीट होते .


पेरू=पेरू हे फळ कुठेही सहज येत .पेरूचा सेवण जर आपण रोजच्या आहारात केला तर पोट सहज साफ  होते.




सफरचंद =हे फळ रोज खा असा सल्ला डॉक्टर  स्वतःच सांगतात कारण सफरचंद हे आरोग्याच्या     दृष्टीने खूप फायदेशीर अस फळ आहे .जर आपण सफरचंदाचे सेवण जर रोज केले  आपल्या शरीराला खूप फायदा होतो.


[[बाजार पेठेत मालाला कमी किंमत ]]


भारतीय शेती मालाला बाजार पेठेत योग्य असा बाजार भाव  नसल्यामुळेच  त्याच्या मालाला योग्य अशी किंमत बाजारात मिळत नाही .बाजारपेठेत शेतकऱ्यांचा माल अतिशय कमी दरात खरेदी केला जातो त्यामुळेच शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत.खतांच्या वाढत्या किंमती ,वाढती महागाई  याच गणीत शेतकरी जुळवू शकत नाही. त्यामुळेच जर शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळाला तर शेतकरी सुखी होईल. जर शेतकऱ्याकडे चांगले पैसे आले तर त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता येईल. 


[[शेतकऱ्यांना अवकाळी संकट]]



भारतीय  शेतकरी शेतीत कधी दुष्काळ तर कधी महापूर यामुळेच आपल्या देशातील शेतकरी हा कधी कधी संकटात सापडतो आणी शासकीय योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना कधी घेता येत नाहीत कारण शासनाच्या योजना काय आहेत याबद्दल माहीती कधी शेतकऱ्यांना माहीत नाही.त्यामुळेच शेतकरी अश्या योजनेचा लाभ घेता येत नाही.











Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming