शेती शिक्षणाचे महत्व आणी गरज

 [[शेती  शिक्षणाचे महत्त्व आणी गरज]]


●भारत  हा कृषिप्रधान देश आहे .आपल्या देशातील बहुतांश  लोक  शेतीवर अवलंबून आहेत .भारतीय शेती ही प्रामुख्यान पारंपारिक पद्धतीन  चालु आहे .त्यामुळेच शेतीला जर  शिक्षणाची जोड मिळाली तर  आपल्या देशातील शेतकऱ्यांना विकसित देशातील नवनवीन  तंत्रज्ञानाची जाणीव  होईल  त्यामुळेच आपण आपल्या मुलांना प्रामुख्यान शेती शिक्षण  घेण्यास प्रवृत्त कराव कारण भविष्यात शेतीला  खुप  महत्त्व येणार आहे . आपण काहीही खरेदी करू शकतो पण शेतीवर  आधारित कच्चा माल माञ  आपणास शेतीपासून मिळतो .कारण कच्चा माल ना कुठली कंपनीत तयार होतो नाही कुठलीच फॅक्टरीत त्यामुळेच शेती ही फार महत्त्वपूर्ण आहे .पण सध्याची परिस्थिती बघता आताची मुल शेती करण्यास तयार नाहीत आणी शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर कुठलीच मुलगी लग्न करण्यास तयार होत नाही.त्यामुळेच आपल्या देशात शेती शिक्षण फार महत्त्वपूर्ण झाले आहे.शेतीच्या शिक्षणामूळ आपल्या देशातील बहुसंख्य मुल आता शेतीचे शिक्षण घेत आहेत त्यामुळेच शेतीत नवनवीन प्रयोग करून आजचा तरुण आपली आर्थिक व सामाजिक प्रगती करत आहे.त्यामुळेच आज उत्पादनात भरपूर वाढ होत असलेली दिसून येत आहे .त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल शिक्षण व आरोग्य सेवा घेता येत आहेत. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन पिढी शेती या व्यवसायात उतरली आहे .पहील आपण कुठलाही माल विकायचा म्हणला तर आपणास व्यापाऱ्यांवर अवलंबून रहाव लागायच व ते म्हणतात त्या दरात आपणास आपला माल विकावा लागत असे .त्यामुळेच आपणास हवा तेवढा बाजारभाव मिळत नव्हता .पण आता आपणास इंटरनेट च्या माध्यमातून रोज बदलत असलेला बाजारभाव   याची माहीती मिळते त्यामुळेच आपणास हमीभावात कुठल्याच प्रकारचा तोटा सहन करावा लागत नाही आणी आपणास काही जरी अडचण आली तर ॲग्रो ॲप आहे  आपण काही शंका असल्यास तेथे फोन करून आपल्या अडचणी दूर करू शकतो ●


शेतीचे महत्व





 ●कारण वाढ त असलेले रासायनिक खतांचा भाव व त्यामुळेच खतांवर होणारा खर्च. खत किती प्रमाणात वापराव या च  मार्गदर्शन करायला कोणी नाही त्यामुळेच खतांवर होणारा खर्च वाढत चालला आहे .त्यामुळेच प्रत्येक ठीकाणी शेतीसाठी होणारा खर्च व उत्पादनात  होणारी घट पाहता.  त्यामुळेच आपणास शेतीसाठी शासनाकडून प्रत्येक ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळेत शेतीतील मातीचे परीक्षण  जर  आपण केल तर  आपण त्या शेतातील पीकांना कुठले खत वापरायचाच हे  आपणास कळु शकत व त्या पीकांना काय कमी पडत हे मातीपरिक्षणादवारे आपणास कळत ..व त्या पिकांची वाढ आपण कमी पैशात जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकतो●


 ●.शेती शिक्षणाच महत्त्व वाढत चालल आहे.त्यामुळेच आपणास शेतीच्या शिक्षणाची गरज वाढत चालली आहे.कारण शेतीच बदलत चाललेले  वातावरण त्यामुळेच अनियमित पाऊस ,कधी पुर तर कधी पाणी नसल्यामुळेच पीक जळतात. त्यामुळेच शेतीला नवनवीन तंत्रज्ञान वापरण्याचे गरज आहे .इसञाइल देशाप्रमाण आपल्या देशातील शेतकऱ्यांनी ड्रिप तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी .कारण ड्रिप तंत्रज्ञानामुळ आपण पाण्याचा कमी प्रमाणात वापर करून शेती योग्य प्रकारे करु शकतो.ड्रिप चा वापर केल्यास आपण कमी प्रमाणात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ शकतो ●


●शेती क्षेञात  आता बरेच शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळू लागले आहेत कारण नैसर्गिक शेतीवर होणारा जो खर्च आहे तो खर्च अतिशय कमी प्रमाणात आहे .शेती क्षेत्रात नवीन बदल करत आहेत. बदलत्या  काळानुसार आता शेतकरी शेतीत बदल करत आहेत.  आणी त्यामुळेच आता शेतकरी फूल शेतीकडे वळाला आहे कारण  फूलाला मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.त्यामुळेच आपल्यातील बरेच शेतकरी फुल शेतीकडे वळत आहेत.  कारण  त्यापासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळत आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समाधान मिळत आहे●


●शेती शिक्षणाच महत्त्व  आहे.  कारण शिक्षण घेतल्यानंतर आपणास  शेती क्षेत्रात होत असणारे बदल जस शेती क्षेत्रात आपण  स्प्रिंकलर चा  सुद्धा वापर  करू शकतो शेती उत्पादन हे शेतीची आवश्यक मशागत, विविध निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते. कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी सुधारीत बियाणे, खते, पीक किड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात. परंतु, वरील कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा म्हणजे कृषी तंत्रज्ञान. देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष परिश्रम घेऊन विविध विषयांसंबंधी सुधारित कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून करून दिले आहे. पिकांचे सुधारीत वाण, खताच्या मात्रा, पेरणीपध्दती, सिंचनपध्दती, पाणी व्यवस्थापन, अंतर्गत मशागत, पीक संरक्षण, जमिनीची मशागत, सुधारित अवजारे व यंत्रे आणि इतर शेतीसंबंधी विषयावर सुधारित तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विविध पिके, भाजीपाला, फळशेती, फुलशेती, पशुसंवर्धन, चारा पिके आणि यांत्रिक शेती याबाबत मोठ्या प्रमाणात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान आज उपलब्‍ध आहे●



●सर्वसाधारणपणे १००० ते १५०० लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने २ ते ३ उच्चशिक्षित डॉक्टरांची गरज असते. तसेच तीन ते चार कृषी पदवीधर स्वतः शेती करीत असतील तर त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतीचे हंगामानुसार नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी कृषिविषयक ज्ञानाची-माहितीची गरज आहे. कृषितज्‍ज्ञ हे ग्रामीण भागात कृषिविषयक मार्गदर्शन व सल्लागार म्हणून कार्यरत असल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच फायदा होईल●



[[शेती शिक्षणाची गरज]]

●शेती पुर्वी  जुन्या काळातील लोक परंपरागत शेती करत होते पण आता वाढती महागाई बघता आपण जुन्या काळाप्रमाण शेती करण परवडणार नाही .कारण पुर्वी लोक शेतीवर होणारा खर्च व त्यापासून निघणार उत्पादन  याच गणीत शेतकरी करत नव्हता .कारण शेती व्यवसायात बदल केल्याशिवाय आपल्या उत्पादनात भरपूर वाढ होते. शेतीला शिक्षणाची जोड मिळाली तर आपण शेती क्षेत्रात बदल होत चालला आहे. शेतीला शिक्षणाची गरज आहे कारण शेतकऱ्यांच्या मालाला दर पाहीजे एवढाच मिळवायचा असेल तर आपण शेतीत बदल करणे आवश्यक आहे●



●आपण आपला माल योग्य दर  असलेल्या व्यक्तींना  विकावा कारण जर आपणास विक्री करून जर योग्य दर नाही मिळाला तर आपणास काही परवडत नाही त्यामुळेच आपणास योग्य त्या माहितीची गरज आहे व ती माहीती आपणास मिळु शकेल. शेती शिक्षणाचा फायदा आहे कारण शेतीमध्ये बरेच बदल होत आहेत. शेती शिक्षण जर आपण घेतले तर आपण एखाद रासायनिक खतात दुकान देखील टाकू शकतो .जर आपण शेती शिक्षण घेतल तर आपण शेती विमुक्त कशी करायची ते आपणास कळू शकते .शेती शिक्षणाची गरज वाढत चालली आहे कारण सध्याच वातावरण पाहता शेती शिक्षण फार महत्त्वपूर्ण झाल आहे. शेती वर आपण प्रथम शेतकरी योजना जस शेततळ बांधण त्याचअनुदान कस मिळणार याचा अभ्यास आपणास करावा लागतो●

  


 ●पिकांवर पडणाऱ्या कीडा आळीच नियंत्रण करण्यासाठीच आपण कुठल्या कीटकनाशक चा वापर करावा याचा अभ्यास करण्यासाठीच शेती शिक्षण हेच महत्त्वपूर्ण आहे.त्यासाठीच आता प्रत्येक ठीकाणी ॲग्रीकल्चर काॅलेज  हे तर प्रत्येक ठिकाणी आहेत त्यामुळेच या काॅलेज च्या माध्यमातून आपणास शेतीच नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यास  मिळत आहे.त्यामुळेच आपणास शेती क्षेत्रात वेगवेगळ प्रयोग करण्यास मिळत आहेत ●






●शेती ही काळाची गरज आहे.  कारण  भविष्यात आपणास शेतीशिवाय पर्याय  नाही  ●





●कारण वाढ चाललेली लोकसंख्या  त्यामानान कमी होत चाललेले रोजगार यामुळेच आपणास मोठी अडचण निर्माण होत आहे. परिणाम बेरोजगार तरुण वाढत आहेत. यामुळेच बेरोजगार तरुण व्यसनाधीन झाला आहे .व त्या तरुणाला जर सावरायच असेल तर आपणास शेती हाच पर्याय आहे. कारण  शेती केल्यास त्या तरूणास रोजगार मिळेल. नवनवीन प्रयोग करून तरुण आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ करेल●


 [[त्यामुळेच शेती हाच  महत्त्वपूर्ण पर्याय आहे.]]

 





Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming