शेती शास्त्र
[[शेती शास्ञ ]]
●शेती व्यवसायाचा व्याप बराच मोठा आहे .आपल्या अन्न, वस्त्र ,निवारा या गोष्टी शेतीवर अवलंबून आहेत .याबरोबरच गुरे पाळणे ,मेंढ्या चारणे, कोंबडयापालन ,मत्स्यपालन, अश्याच प्रकारची कामे
शेतीत केली जातात. थोडक्यात मनुष्यबळ किंवा यांञिकीकरण यांच्या साहाय्याने आपल्या जमिनीची मशागत करण यालाच शेती असे म्हणतात •
●यात पशुपालन याचा सुद्धा समावेश होतो .शेतीचे दोन प्रकार आहेत जिरायती शेती ,बागायती शेती जी शेतीत आपण जी पीके काढतो त्यांचे दोन हंगाम आहेत. रब्बी व खरीप पीक. सुरूवातीला जेव्हा पाउस पडतो त्यामुळेच वेळेस आपण जी पेरणी करतो त्या पीकांना खरीप पीक म्हणतात. आपण जी पिके हिवाळ्यात पेरतो त्यांना आपण रब्बी पीक अस म्हणतात. बागायती पीक जी पीक आपण विहरीच्या किंवा पाट पाण्यावर भिजवतो त्यात भाजीपाला,फळबाग किंवा उस शेतीचा समावेश होतो .जगातील अनेक व्यवसायांपैकी शेती हा सर्वात जुना व्यवसाय आहे .कारण अन्न वस्त्र, निवारा या माणवाच्या प्रमुख गरजा आहेत. या गरजा फक्त शेतीवर पुर्ण होतात .त्यासाठी मानव एका ठीकाणी स्थायिक झाला व त्याची होणारी भटकंती थांबली. आधुनिक काळात उद्योग व व्यवसाय यांचा विस्तार व विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तरीही आज शेती हाच व्यवसाय सर्वात महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. जगीतील बरेच लोक शेती करतात कारण शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कंपनीत कुठलाही पदार्थ बनु शकतो माञ आपण जे अन्न ग्रहण करतो ते अन्न मात्र शेतीत उपलब्ध होते.जगातील उत्पादनापैकी वीस टक्के उत्पादन हे मांसाचे उत्पादन आहे .मांस उत्पादनासाठी बकऱ्या पालन करण हे फार महत्त्वाचे आहे. म्हणजेच कुठल्याही व्यवसाय करण्यासाठी आपणास शेती या व्यवसायावर अवलंबून रहावे लागते. जगाची लोकसंख्या प्रती वर्ष वाढत चालली आहे. त्यामुळेच अन्न धान्य याचा तुटवडा भासत आहे. जगात कुपोषण व दारिद्र्य सारख्या समस्या वाढत आहेत .हे सोडविण्याच्या दृष्टीने शेतीचा विकास ही सर्वात महत्त्वाचा भाग आहे •
[[शेतीचे अर्थशास्त्र समजून घेण आवश्यक आहे. शेतीचे उत्पादन समजून घेणे आवश्यक आहे. कारण जर आपण शेतीच अर्थशास्त्र समजून घेतले नाही तर आपण आपल्या उत्पादनात वाढ होते का घट होते याचा अंदाज अपणास येणार नाही.आपण शेतीच्या अर्थिक गणीत समजून घेतले तरच आपणास शेती फायद्याची करता येईल त्यासाठी आपण शेतीचा खर्च व शेती उत्पादन याचा अंदाज अपणास येईल कारण शेतीकडे आपण व्यवसाय या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे कारण शेती ही काळाची गरज आहे ]]
■शेतीचे अर्थशास्त्र म्हणजेच काय तर आपण शेतीवर कीती खर्च करतो व आपणास कीती त्यापासून फायदा होतो ते पाहणे.जर आपल्याला एखाद्या पीकात जर तोटा झाला तर तो तोटा कसा झाला याचा अभ्यास केला पाहीजे. नंतर आपण त्या चुका भविष्यात करू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण शेतीत शेतीचा अभ्यास न करता उतरण तोट्याच असत .कारण शेती करताना आपण कुठल्या प्रकाराची पिके करावीत याचा अंदाज घेतला पाहीजे .कारण शेती ही करण्यासाठी लागणारी औषधी, बी,बियाणे यांची वाढत चाललेली किंमत त्यामागील निघणार उत्पादन याच गणीत शेतकऱ्यांना जुळवता आल पाहिजे. कारण शेती फायद्याची कधी ठरेल तर आपण शेती योग्य प्रकारे केली■
●शेतीसाठी आपण वनस्पती विज्ञान याचा अभ्यास केला पाहीजे. वनस्पती विज्ञानामध्ये आपण कुठल्या पिकाची लागवड करावी .त्यांना कुठल्या प्रकाराचे वातावरण आवश्यक आहे व त्यांना कुठल्या प्रकाराचा खात वापरायचा .फळांची लागवड करत असताना त्यांना कुठल्या जाती वापरायच्या व त्या झाडांना कुठल्या प्रकाराचे वातावरण आवश्यक आहे याचा अभ्यास आपण शेती विज्ञानात करू शकतो●
●कटकारस्थान हे वनस्पतीना फायदेशिर व हानिकारक असणारी कीटकनाशक यांचा अभ्यास यात केला जातो. ●
●आपल्या डोळ्यांना जे सूक्ष्म जीव दिसू शकत नाही अश्या सुक्ष्म जीवाचा अभ्यास आपणास करता येतो. ●
●पशुवैद्यकीय शास्ञात पशुंची आपण निगा कशी राखायची त्यांची काळजी आपण कशी घ्यावी याचा आपण अभ्यास केला पाहीजे .त्यांना कुठलाही आहार द्यायचा याबद्दल माहिती मिळते●
■शेती अभियांत्रिकी मध्ये आपण निरनिराळी औत बनविणे व औजार तयार करणे नांगर तयार करणे. फण त यार करण पाटबंधारे उभारण,धरण बांधण ,बांध घालण व शेतीसाठी लागणार बांधकाम
●शेतीचा धंदा जरी जुन्या काळापासून चालत आला असला त्यासाठी लागणार ज्ञान जरी अनुभवाने व परंपरेन मिळत असेल तरी विकसित राष्ट्राने शेतीविषयक प्रश्न हाताळुन शेतीला एक प्रगत दर्जा प्राप्त करून दिला पाहिजे●
,●शेतीला आधुनिक पद्धतीन शेती करण गरजेच आहे .कारण शेती व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीन व्यवसाय केला जातो .शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण शेतीचा दर्जा सुधरवू शकतो .जस आपण पुर्वी शेतीला जर पाणी द्यायचो त्या वेळेस आपणास पाणी देण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागत होता .पण आता जर आपण ड्रिप इरिगेशन चा वापर करून जर आपण शेतीला पाणी दिले तर आपल्या उत्पादनात वाढ होते .ड्रिप इरिगेशन मूळ आपणास ड्रिप मधुन पीकांना लिक्विड सोडता येत. ड्रिप चा वापर केल्यास कुठल्याच पीकांना पाणी कमी पडत नाही .शेती ही फायदेशीर व्हावी यासाठीच ड्रिप खुप फायदेशीर ठरणार आहे .शेती करण्यासाठीच आता ड्रिप इरिगेशन मूळ बराच फायदा झाला आहे .ड्रिप मुळ आता आपली शेती माळरानावर करण सोप झाल आहे .व त्यामुळेच आता शेतकरी माळरानावर सुद्धा फळबाग फुलवू लागला आहे ●
●शेतकरी आता शेतीत वेगवेगळ बदल करू लागला आहे कारण पुवीॅ शेतकरी हा शेतीत नवनवीन प्रयोग करत नव्हता .पण आता शेतकरी आपल्या शेतात ड्रॅगन फुड सारख फळ घेत आहे .कारण ड्रॅगन फुड हे एक बाहेरच्या देशातील फळ आहे आपल्या देशातील वातावरणात हे फळ येत नाही तरीपण बरेच शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे ●