goat farming
goat farmingमागेल त्याला शेततळे या योजनेची माहीती खालील प्रमाणे.
नमस्कार शेतकरी मिञानो आपण मागेल त्याला शेततळे या योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यामध्ये शेततळे अनुदान उद्दिष्ट, लाभार्थी या योजनेस पाञ आहे का नाही ते पाहून मग त्यालाच शेततळे मिळते.अर्ज कुठे करायचा शेततळयावर किती अनुदान असणार याची सर्वच जबाबदारी शासनावर असेल.
मागेल त्याला शेततळे या योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे त्यामुळे माळरानावरील पिके पावसावर अवलंबून आहेत.पण पावसाचे प्रमाण सध्याच्या काळात फार कमी होउ लागले आहे परिणामी याचा पिकावर फार मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
.पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.त्यामुळेच शेततळयातची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे.शेततळयात आपण पावसाळ्यात पाण्याची साठवणूक करून नंतर आपण त्या पाण्याचा उपयोग आपणास ज्या वेळेस पाणी टंचाई जाणवत असेल त्यावेळेस आपण पाण्याचा वापर करू शकतो.'goat farming'
जर आपल्याकडे बोअरवेल असेल तर आपण पाणी विहरीत सोडण्या ऐवजी डायरेक्ट शेततळयात पाणी सोडावे.त्या पाण्याचा वापर पिकांसाठी करावा.
शेततळ्याची ही योजना आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या रानात शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरपूर वाढ होत आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे.
शेततळयासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे त्यामुळेच शेतकऱ्यांना प्रथम शेततळयासाठी फार काय खर्च होत नाही .अनुदान असल्यामुळेच फार मोठ या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे.शेततळयामूळे आपणास त्याचा उपयोग मत्स्य पालन करू शकतो.
goat farming
मागेल त्या शेतकऱ्यांना लाभार्थी पाञता
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 0.60 हेक्टर जमीन जर नावावर असेल तर तो शेतकरी या योजनेत पाञ असतो.
यापूर्वीच इतर कोणत्याच योजनेचा शेततळे किंवा सामुदायिक शेततळे या योजनेचा त्या शेतकऱ्यांने लाभ घेतलेला नसावा.जर या योजनेचा जर आपण याआधी वापर केला असेल तर तो शेतकरी पाञ असणार नाही.
लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळयासाठी पाञ असणे आवश्यक आहे
मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी लाभार्थी निवड
लाभार्थी शेतकरी दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिना प्राधान्य देण्यात येते
याव्यतिरिक्त इतर सर्व शेतकऱ्यांना शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते
मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे अनुदान रक्कम
शेतकऱ्यांच्या शेततळयाच्या आकारमानात नुसार अनुदान रक्कम ठरवली जाते.शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम फक्त ठरल्यानुसार फक्त पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान शासनाकडून आपणास जमा केले जाते .उर्वरित रक्कम माञ शेतकऱ्यांना स्वतःला भरावी लागते.
मागेल त्याला शेततळे या योजनेत शेततळयाचे आकारमान
या योजनेंतर्गत खाली दिलेल्या आकारमानापैकी एका आकार मानाचे शेततळे आपणास घेता येते
जर आपणास शेततळे सामुदायिक पद्धतीत करायचे असेल तर आपणास कमीत कमी पाच शेतकऱ्यांचा एक गट करून सामुदायिक शेततळयासाठी अर्ज करता येतो.शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान. पाण्याचा होणारा वापर याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करावा.तो आपल्या अर्जा सोबत सादर करावा..
goat farming
शेततळे बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी
कृषी विभागाच्या कृषी साहाय्यक यांनी शेततळयासाठी निश्चित केलेल्या जागीच शेततळे घेणे आवश्यक आहे.
कृषी विभागाचा शेततळे बांधण्यासाठी आदेश मिळाल्यानंतर त्या शेततळयाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करावे लागते.
लाभार्थी ने स्वतःचे बँकेतील खाते क्रमांक कृषि अधिकाऱ्यांना सादर करावा.किवा कृषि सेवक यांच्याकडे पासबुक सहित झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे
शेततळयाच्या कामासाठी कुठलीही ॲडव्हान्स रक्कम मिळणार नाही.
शेततळ्याची निगा राखण्याचे काम स्वतः शेतकऱ्याची राहील .
पावसाळ्यात शेततळयात गाळ वाहून येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी
लाभार्थी शेतकऱ्यांने आपल्या सातबारा उताऱ्यावर शेततळयाची नोंद करणे आवश्यक आहे.
शेततळे पुर्ण झाल्यावर या योजनेचा बोर्ड स्वतः शेतकऱ्यांनी लावावा.
नैसर्गिक आपत्तीपासून जर शेततळयाचे काही नुकसान झाले तर त्याला शासन जबाबदार राहणार नाही
जेवढे शेततळे त्या शेतकऱ्यांना मंजूर आहे तेवढेच शेततळे करावे.
मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी आवश्यक कागदपञ
जमिनीचा सातबारा उतारा
8अ प्रमाण पञ
दारिद्र्य रेषेखालील दाखला
शेततळे योजनेसाठी अर्ज कुठे करावा
अर्ज करण्यासाठी आपल्या जवळ च्या महाइसेवाकेंद्रात जावुन आपण आपल्या तालुक्यातील कृषी आधिकारी यांची भेट घ्यावी
http//aaplesarkar Maharashtra gov in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.