कृषी आधारित लघु उद्योग
[[ कृषी आधारित लघु उद्योग ]]
[कृषी आधारित लघु उद्योग या लघुउद्योगात दुग्धव्यवसाय , कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, मधमाशी पालन, असे कृषी आधारित उद्योग अवलंबून आहेत.पण अश्याच लहान लहान उघोगावर आपला शेतकरी वर्ग अवलंबून आहे.
1) दुग्धव्यवसाय =कृषी आधारित उद्योग म्हणजेच शेतीवर आधारित असे उद्योग .शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय हा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे.या व्यवसायात शेतकरी पशुपालन करून त्यामार्फत दुध विक्री करून दुग्धव्यवसाय करून आपल्या शेतीला आधार देण्याचे काम करत आहे. शेतकरी शेती करताना दुधाचा वापर दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. दुधापासून दही तयार करता येते .दुधापासून ताक तयार करता येते.दुध आटवून आटवून तयार होतो तो खवा .दुधापासून तूप, ताक ,दही,लस्सी ,खवा ,पेढा ,बासुंदी अशा प्रकारचे पदार्थ तयार करणे आहेत.
[[कुक्कुटपालन कसे कराल याविषयी आपण माहीती घेऊ.]]
[कुक्कुटपालन पालन हा व्यवसाय करण्यासाठी आपण मुक्त गोठयाचा सुद्धा वापर करू शकतो.हा व्यवसाय करताना आपण देशी म्हणजेच गावरान जातीच्या कोंबड्याचे पालन करावे कारण त्या कोंबड्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते .कुक्कुटपालन पालन करत असताना आपण कोंब डब्यांच्या कोणत्या जातीची निवड करतो याची पाहणी करावी .आपला उद्देश मुख्य उद्देश अंडी उत्पादन व मास उत्पादन हा आहे.
[[कुक्कुटपालन पालन करत असताना शेतकऱ्यांनी मुक्त संचार पद्धतीन कुक्कुटपालन केल्यावर अनेक फायदे होतात. मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन पालन केल्यास आपण 50 किंवा त्यापेक्षा अधिक पक्षी सांभाळून घेता येतात. कमीत कमी भांडवल लावून आपण जास्तीत जास्त कमाई करता येते .सुरूवात जर आपणास करायची असेल तर एक दिवसाची पिल्ले खरेदी करून सुरुवात करू शकतो.कोंबडया मोकळ्या सोडल्यावर त्यांचा पालन करण्याचा खर्च कमी होतो .कोंबड्या मुक्त संचार असेल तर त्या निरोगी राहतात !!
[[मुक्त संचार पद्धतीन कुक्कुटपालन पालन करण्याचे फायदे]]
1)जर मुक्त पद्धतीन आपण कुक्कुटपालन केले तर आपण खादयावरील खर्च कमी करू शकतो जर मुक्त वावर असेल तर आपण कोंबड्यांना शिळे अन्न हे देखील देउ शकतो आणी सांडलेले अन्न खाऊन देखील कोंबड्या आपले जीवन जगू शकतात. फक्त त्यांचे आपणास कुञ, कोल्हयापासून आपणास रक्षण करावे लागते.
2)गावरान कोंबड्या ह्या आपले अन्न स्वतःचाच शोधून स्वतःच पोट भरू शकतात .हे पक्षी सगळीकडेच किडे ,टाकाऊ अन्न खाऊन जगतात.
3)मुक्त संचार पद्धतीन कुक्कुटपालन केले तर राञी निवारा यासाठीच शेडमधये येतात .
[[नियोजन ]]
[[जर आपण अंडी उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून कुक्कुटपालन करण्याचा विचार करत असेल तर आपण पण गावरान पक्षी सांभाळ करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. गावरान पक्षी उत्पादन घेण्यासाठी फार चांगले असतात कारण गावरान पक्षी हे निरोगी असतात . जर आपण योग्य नियोजन केले तर आपल्या पक्षांची वाढ देखील चांगली होते व त्याना विक्रीसाठी दर चांगला मिळतो!!
[[मत्स्यपालन ]]
[[मत्स्य पालन करत असताना प्रथम आ पण टाकी किंवा एक शेततळ बांधण आवश्यक आहे.मतस्य पालन करण्यासाठीच आपण प्रथम शेततळ किंवा टाकीत मासे सोडुन द्यावेत नंतर आपण आपल्या माश्यांना खायला घालण्यासाठी आपण आपल्या घरातील शिळे अन्न देखील खाऊन मासे जगतात. त्यामुळेच मत्स्यपालन करत असताना माश्यांचा खर्च जास्त करावा लागत नाही. त्यामुळेच माश्यांवर जास्त खादयावरील खर्च होत नाही .मासे शिळे अन्न खाऊन देखील जगतात. व शेवाळावर देखील मासे जगतात व माश्यांना मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे .त्यामुळेच त्यांना विक्री करण्यात काहीच अडचण येणार नाही .कारण माश्यांची आवश्यक ता होटेल व्यवसाय करणारे लोक किंवा घरगुती विक्री करून सुद्धा मासे विक्री करता येते !!
[[रेशीम उद्योग ]]
[[रेशीम उद्योग हा एक शेतीपूरक हा व्यवसाय आहे.रेशीम उद्योग करण्यासाठी फार मोठा खर्च होत नाही. रेशीम उद्योग सुरुवात करत असतानाच प्रथम आपण तुतीची लागवड करणे आवश्यक आहे!!
[तुतीची लागवड नवीन तंत्रज्ञान ने केल्यावर लागवडीसाठी मजुरांचा खर्च कमी होतो.शेतकऱ्याना या उद्योगात कमीत कमी वेळेत जास्त उत्पादन काढता येते.पक्का माल विक्री करण्यासाठीच बाजारभावाबददल काळजी करायची गरज नाही कारण शासनाकडून खरेदी चा हमीभाव हा ठरल्यानुसार मिळतो .त्यामुळेच आपणास हमीभावात बाजारभावाबददल काळजी करण्याची गरज नाही .तुतीची लागवड आपणास पाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनीत करावी कारण तुतीच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.या तुतीची लागवड करण्यासाठी पट्टा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल.पट्टा पद्धतीने लागवड केल्यावर पाणी हे अतिशय कमी प्रमाणात लागते.तूतीची लागवड आपण एकदा केल्यानंतर आपणास 15वर्ष उत्पादन देते आपणास परत परत लागवड करावी लागत नाही.त्यामुळेच वारंवार येणाऱ्या लागवडीचा खर्च येत नाही .तुती एप्रिल मे महिन्यात पाणी कमी येते तरी तुती मरत नाही!!
[[शेतीपूरक व्यवसाय रेशीम उद्योग रेशीम उद्योग हा शेतीपूरक उद्योग आहे आपण चांगल्या प्रकारचे रेशीम आणून त्या रेशीम आपण अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून आपणास चांगले उत्पादन घेता येते रेशीम उद्योगासाठी तूतीच्या पानांची लागवड करावी लागते या उद्योगासाठी शासन अनुदान देखील देते !!
[[एकरी 4बाय 4या अंतरावर तूतिच्या पानांची लागवड केली तर आपणास एका एकरात जर एक लाॅट गेला तरी खर्च वगळून महीन्यात पन्नास हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो!!
[[मधमाशी पालन ]]
[मधमाशी पालन हा व्यवसाय एक महत्वपूर्ण व्यवसाय करण्याची परंपरा जुनी आहे.मधाचे उत्पादन वाढविण्यात यावे यासाठीच मधमाश्या पालन केले जाते.पण आता मधमाशी पालन करणे सोपे झाले आहे कारण मधमाश्यांचे पालन करण्यासाठीच केंद्र सरकार योजना राबवत आहे त्यातील बऱ्याच योजना आजही आहेत. अशाच योजनेंतर्गत मधमाशापालन करण्यासाठीच कर्ज वाटप होत आहे .त्यामुळेच आपल्या देशातील शेतकऱ्यांच उत्पादन वाढाव यासाठीच केंद्र सरकार ने ही योजना सुरु केली आहे.केंद्र सरकार राज्य सरकार च्या व केंद्र सरकार च्या मदतीने वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळेच बहुतेक योजना आजही सुरु आहेत. अशाच शेतकऱ्यांना कृषी आधारित उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज वाटप करण्यात येणार आहे .देशातील शेतकऱ्यांच उत्पादन वाढाव हाच यामागील उद्देश आहे !!
[[देशातील गरीब व गरजू असणाऱ्या शेतकऱ्यांच उत्पादन वाढाव यासाठीच केंद्र सरकार बऱ्याच योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहेत.त्यातील बऱ्याच योजना आजही चालू आहेत. मधमाशापालन करण्यासाठीच 2ते5लाखापर्यंत कर्ज मंजूर होते.त्यातील 65टक्के रक्कम शासनाकडून दिली जाते.मधमाशापालन करण्यासाठीच आपण नवीन तंत्रज्ञान म्हणून लाकडी पट्टीचा देखील वापर करू शकतो.लाकङी पेटी चा वापर केल्यास मधमाश्या बाॅक्समधुन मध काढणे सोपे जाते.कमी गुंतवणूक करून आपण फार मोठ्य प्रमाणावर उत्पादन घेऊ शकतो !!
[[फुलशेती]]
फुलशेती हा कृषी आधारित एक उद्योग आहे .फुलशेती आपण बऱ्याच प्रकारची करू शकतो. जशी की गुलाब शेती .कारण गुलाब या फुलाला मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच फुल शेती ही प्रचंड फायदेशीर झाली आहे .कारण फुलाला बाहेर च्या देशात प्रचंड प्रमाणात मागणी आहे .गुलाब या फुलाचा वापर विविध प्रकार चे कॉस्मेटिक व विविध प्रकार चे अत्तर सेंट यासाठीच करता येतो!!
[[सुर्यफूल]]
सुर्यफूलाचा वापर हा तेल बनवण्यासाठी होतो .कारण सुर्यफूल आपल्या आरोग्यासाठी चांगल आहे .कारण त्यामध्ये अँटी ऑकसिंडंट हे गुण असतात त्यामुळेच त्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे .सुर्यफूल लवकर खराब होत नाही .याची लागवड आपल्या देशात अतिशय कमी प्रमाणात होते .त्यामुळेच आपल्या देशात सुर्यफूल तेल महाग आहे तरीपण सुर्यफूलाला मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे!!
[[ झेंडू ]]
[झेंडू या फुलाची लागवड करताना चांगल्या रानात करावी कारण झेंडू या फुलाला पाणी लागते जर पाणी कमी प्रमाणात मिळाले तर झेंडूच्या रोगाची लागण होत नाही .त्यामुळेच त्याला योग्य नियोजन करावे लागते. झेंडूचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो .लग्नसमारंभ असूदया नाहीतर कुणाचा वाढदिवस किंवा कुणाचा सत्कार असेल तर त्यासाठी झेंडूचा वापर केला जातो!!
[[ॲस्टर फूल ]]
[आपल्याकडे तिन्ही हंगामात याफुलाची लागवड करता येते .हार बनविणे ,फुलदाणी तयार करणे .लग्नसमारंभ तसेच गणपती उत्सव दिवाळी दसरा ,नाताळ सारख्या सणांना ॲस्टर फुलाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे!!
[[निशिगंध ]]
[निशिगंधाची फुले पांढरीशुभ्र असुन हे फुल सुवासिक असल्यामुळेच हे फुल वेणी ,गजरा ,पुष्पहार, फुलांच्या माळा कींवा फुल दांडेकर फुल दाणी ,पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. निशिगंध पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते .कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय आहे.निशिगंधासाठी पाण्याचा निचरा करणारी जमीन असावी!!
[गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी तयार केलेल्या ढिगांमधून पाण्याचा योग्य निचरा सोबतच 40ते50टके ओलावा टिकावा याची काळजी घ्यावी.ढिगातील तापमान 20ते30अंश दरम्यान असावे.तसेच पूर्णवेळ सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. ढिगातील गांडूळांचे वाळवी, बेडूक, साप,मुंग्या ,गोम ,उंदीर यांच्यापासून संरक्षण करावे!!
[[गांडूळखत निर्मिती]]
[[खतासाठी ढीग तयार करण्याची पद्धत ]]
[सुरुवातीला ढिगाच्या बुडाशी 15 सेंटिमीटर जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा म्हणजेच गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन व तुरीचा पालापाचोळा यांचा थर करावा सेंद्रिय पदार्थांचा थरावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती 3:2प्रमाणात मिसळावी !!
[[गांडूळ खतांचे फायदे ]]
[गांडूळ खतात नञ,स्फुरद,पाला तसेच दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात .जमिनीची उत्पादकता आणी पोतामध्ये सुधारणा होते.जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते ,धूप कमी होण्यास मदत होते.जमिनीतील गांडूळ खतांमूळे मातीच्या थरांची उलथापालथ होते.त्यामुळेच जमिनीत खोलवरील पिकांसाठी उपयुक्त आहे.जमिनीचा कस टिकून राहतो.उत्पादन क्षमतेसोबतच जमिन सुपीक होउन हवा खेळती राहते त्यामुळेच पिकांमध्ये पांढऱ्या मुळीची योग्य प्रकारे वाढ होते!!
[[गांडूळ खत निर्मिती ]]
[पाण्यामध्ये शेण कालवून 10सेंटिमीटर जाडीची थर तयार करावा सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल कुजलेले अन्न गांडूळाला खाद्य म्हणून उपयुक्त राहील!!
[शेवटी ढिगावर सेंद्रिय पदार्थांचे 15सेंटीमीटर जाडीचे आच्छादन करावे.आवश्यकतेनुसार दररोज किंवा दिवसाआड तयार झालेल्या ढिगावर पाणी शिंपडावे!!
[साधारणतः एक ते दोन आठवड्यानी ढिगातील उष्णता कमी झाल्यावर त्यावरील सेंद्रिय पदार्थाचा थर बाजूला सारून गांडूळ सोडावी.गांडूळ सोडल्यावर पुन्हा सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन करावे,नियमित पाणी द्यावे गांडूळ खत निर्मितीसाठी जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो.उत्तम प्रतीच्या गांडूळ खतांचा रंग काळसर चहा पावडर सारखा झाल्यावर गांडूळ खत तयार होते.गांडूळ खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे!!
[[भाजीपाला शेती ]]
[भाजीपाला शेती ही शेती ला पूरक असणारी शेती आहे .कोणताही भाजीपाला लागवड करायचा असेल तर प्रथम आपण रान रेटारेटी च्या साहाय्याने रोटर मारुन घ्यावे .नंतर त्या रानात बेड सोडून भाजीपाला लागवड करावी !!
कारण गावरान भाजीपाला मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे.त्यामुळेच भाजीपाला शेती प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.यापासून मिळणार उत्पादन हे मात्र चांगल्या प्रमाणात आहे भाजीपाला लागवड कुठलीही करा जसे मिरची लागवड ,वांग ,मेथी,कोथिंबीर, पालक, अश्या प्रकार कुठल्याही प्रकारच्या भाजीपाला लावून प्रचंड प्रमाणात नफा मिळवता येतो.
[[शतावरी शेती]]
[शतावरी ही वनस्पती लागवड करण्यासाठी आपल्यालाच पाण्याचा निचरा करणारी जमीन असावी .कारण शतावरी साठी पाण्याचा निचरा करणारी जमीन असावी .शतावरी चा वापर विविध प्रकार च्या आजारात औषधी वनस्पती म्हणून केला जातो. शतावरी शेतीला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही.आठवडयातून एकदा जरी शतावरी ला पाणी सोडले तरी चालेल. कारण शतावरी या वनस्पतीला पाणी कमी प्रमाणात लागत. आज चा शेतकरी भरघोस अश्या उत्पादन देणाऱ्या पीक पद्धतीकड वळला आहे कारण वाढती महागाई यामुळेच तीच पिके घेउन म्हणावे असे उत्पादन मिळत नाही.त्यात रोजचा वाढणारा खर्च बाजारातून येणारा परतावा कमी असतो त्यामुळेच शेतकरी निवड करताना नवीन पिकाची निवड करतो.नवीन पिकांची लागवड करत असतानाच शतावरी ,अश्वगंधा सर्पगंधा , कोरफड अश्याच औषधी वनस्पतीची लागवड करताना दिसत आहे!!
[[तुळस शेती ]]
[तुळस शेती ही फायदेशीर अशी शेती आहे .तुळस ही 24तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे त्यामुळेच तुळस ही खुप महत्वाची वनस्पती आहे .तुळस ही अंगणात असेल तर माणसे कमी आजारी पडतात. तुळस शेती करणे आवश्यक आहे. कारण तुळशीचा उपयोग वाइरल इन्फेक्शन झाले असेल तर तुळशीच्या पंचांगा चा काढा करून त्याचे सेवन केल्यास वाइरल इन्फेक्शन दुर होते!!
[मशरुम शेती]
[मशरूम शेती हा मुळात बुरशी पिकवण्याचा व्यवसाय आहे. आज मशरूमची लागवड हा भारतातील सर्वात उत्पादक आणि फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे. कारण, अल्पावधीत, ते शेतकर्यांच्या मेहनतीचे फायद्यात रूपांतर करत आहे. मशरूमची लागवड ही भारतातील पैशाचा पर्यायी स्रोत म्हणून शेतकरी करतात. मशरूम खायला चविष्ट असतात. आपण याचे सूप, भाज्या, स्ट्यूजमध्ये रूपांतर करू शकतो तसेच आपल्या आवडत्या पिझ्झावर ते टॉप करू शकतो!!
[[कोरफडीचा व्यवसाय]]
[Aloe Vera याला आपण मराठी मध्ये कोरफड आणि हिन्दी मध्ये घृत कुमारी असेही म्हणतो, ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते, आणि हे बहुधा उत्तर आफ्रिकेत उगम पावले असावे असे मानले जाते!!
[[कोरफड ही 2 ते 3 फूट उंच आणि त्याची पाने 1 ते 1.5 फूट लांब असतात. कोरपडीच्या पानांच्या कोपर्यावरती लहान काटे आढळतात. कोरफडीच्या अनेक जाती आढळून येतात आणि त्यांचा उपयोग औषध म्हणून वेगवेगळ्या रोगांवरती केला जातो!!
.आज मार्केट मध्ये याची वाढ जास्त प्रमाणात होत आहे, कारण की ही वनस्पती वेगवेगळ्या रोगांवरती व तसेच कॉस्मेटिक म्हणून याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो.
.कोरफडची शेती करण्यासाठी सुरवातीला थोडा जास्त आहे व नंतर याचा खर्च कमी होतो, एकदा याची लागवड केल्यावर आपल्याला एक वर्षेनी याचे पीक मिळते व तेच रोप आपण सहा वर्षे शेतात ठेऊ शकतो.
5. दूध डेयरी व्यवसाय
[डेअरी फार्म सुरू करणे सामान्यतः ‘ऑल-सीझन संधी’ म्हणून ओळखले जाते कारण भारतात किंवा जगात कुठेही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची सतत मागणी असते. व्यवसायासाठी दररोज 14 ते 18 तासांची आवश्यकता असते. भारतात दुधाचे उत्पादन नेहमीच उच्च असते आणि दरवर्षी 3% – 4% वाढते!!
[या सर्व कारणांमुळे डेअरी फार्मिंग व्यवसाय व्यावसायिक लोकांसाठी एक संपन्न बाजार म्हणून उदयास येत आहे. डेअरी फार्मचे संचालन हे व्यापक प्रयत्न, लक्षणीय वेळ आणि उपयुक्त संसाधनांचे एकत्रीकरण आहे. यासोबतच शेताची स्वच्छता, शेडचे व्यवस्थापन, गुरांना खायला घालणे, किंवा जनावरांना धुणे आणि दुध घालणे यासारख्या अनेक कामांचा समावेश होतो!!
[[कृषि आधारित लघु उद्योग]]
[[7 लाख कर्जावर 33% पर्यंत सबसिडी डेअरी फार्म उघडण्यासाठी दिली जाते. ही सबसिडी नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ने डेअरी उद्योजकता विकास योजना (डीईडीएस) अंतर्गत अनुदान योजना सुरू केली आहे जे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय कर्ज मंजूर बँकांद्वारे सबसिडी मिळवण्याचा लाभ देते!!
[[शेतकऱ्यांना डेअरी फार्मिंग कर्जावर संपूर्ण प्रकल्प खर्चाचे 33.33% अनुदान मिळू शकते. मंजूर प्रादेशिक ग्रामीण बँकांना (आरआरबी) भेट देऊन 7 लाख. किंवा व्यावसायिक आणि सहकारी बँका. अर्जदार सबसिडी आणि कर्ज सुविधांशी संबंधित सर्व आवश्यक माहिती जवळच्या बँकेच्या प्रतिनिधीकडून देखील गोळा करू !!
[[दूध डेअरी व्यवसाय ]]
6. चंदन शेती
[[चंदनाची झाडे त्यांच्या सुंदर सुगंधासाठी लोकप्रिय आहेत आणि त्यांचे लाकूड हे शतकानुशतके वापरले जाते. भारतात चंदनाचे झाड चंदन किंवा श्रीगंध म्हणूनही लोकप्रिय आहे आणि ते सर्वात महागडे झाड आहे!!
]]]]]]]]]]]]]]]]]])]]]]]]]]]