उस लागवड तंत्रज्ञान

 [[उस लागवड तंत्रज्ञान ]]

!!उस लागवड तंत्रज्ञान.हे पीक अतिशय महत्त्वपूर्ण असे पीक आहे या पिकामूळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे . त्यामुळेच  शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनात मोठा बदल  झाला आहे. त्यामुळेच  शेतकऱ्यांच्या मुलांच्या जीवनात आर्थिक सबोधता  आली आहे.आर्थिक सुबत्ता आल्यामुळेच हे पीक  प्रत्येक शेतकऱ्यांच्या रानात  दिसत आहे .कारण या  पिकाला मेहनत फार कमी घ्यावी लागते.उस शेतीबरोबरच शेतीसाठी असणार नवीन तंत्रज्ञान फार महत्त्वपूर्ण आहे .त्यामुळेच उस या पिकाला फार मोठ्य प्रमाणावर महत्व आले आहे.उस लागवड करत असतानाच आपण जुन्या परंपरागत  प्रथा वापरून चालत नाही कारण जुन्या काळातील शेतकरी लागवड करत असतानाच सरी किती सोडावी याचा विचार करत नव्हता त्यामुळेच शेतकऱ्यांच उत्पादन एकरी 30ते40टन निघायच.पण आता जर आपण पाहत असाल की काय काय शेतकरी नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन प्रकारच बेन वापरून एकरी 100टनापर्यंत उत्पादन घेत आहे.आता शेतकऱ्यानीच शेतात सरी सोडताना हवा खेळती रहावी यासाठीच शेतकरी साडेचार ते पाच  फुटी सरीं सोडत आहे .त्यामुळेच बेन ही एक फुट अंतर सोडून टाकत आहे परिणामी उसाचा फुटवा व उसाची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होते.त्याचबरोबर लागवड केल्यावर आपण लगेच 24तासाच्या आत 18टाॅप व गोल याची फवारून घ्यावे त्यामुळेच तन उगवण्याचा प्रश्न  उरणार नाही व त्यामुळेच तन उगवण होणार नाही.परिणामी तननाशकावर होणारा खर्च होणार नाही .



!!उस लागवडीसाठी कोणकोणत्या प्रकारच बेन आवश्यक आहे. 

1)को86032

2)को265

3)को434

4)को740


5)को719




अश्याच प्रकारची बेन उपलब्ध आहेत .




!!उसाची लागवड  आपण  करताना आपण चांगल्याच प्रकारच बेन वापरून लागवड करावी .कारण बेन खराब असेल तर लागवड चांगल्याच  प्रकारे उगवण होणार नाही .परिणामी जिथे जिथे बेन उगवल नसेल तिथ  नर्सरीतून रोप आणुन लावावे .त्यामुळेच आपण प्रथम बेन चांगल आहे का नाही ते पाहणे  नाहीतर उसाची उगवण चांगल्या  प्रकारे होणार नाही .लागवड करण्यासाठी नेहमीच कोवळा उस वापरून लागवड करावी .सात ते आठ महीन्याचा उस वापरावा.उसाची लागवड केल्यावर आपण प्रथम पाणी दिल्यावर लगेच ड्रिप हातरून घ्यावी. जर ङ्रिप केले तर आपणास ड्रिप द्वारे वेगवेगळ्या प्रकार ची औषधे सोडली जातात जसे 19;19;19,052:34:34,15:15:15,अश्या प्रकारची विद्राव्य खते सोडावीत म्हणजेच सुरुवातीला उसाची वाढ चांगल्या प्रकारे होईल. 




!!उसाची लागवड सुरु लागवड व आडसाली लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात लागवड करावी कारण या महिन्यात लागवड केली तर उसाला योग्य असे पोषक वातावरण सापडत असते .या अडसाली उसाला आपणास  सोळा ते सतरा महीने मिळतात त्यामुळेच उसाची वाढ चांगली होते .आडसाली उसाला   पावसाळ्यातील दोन हंगाम सापडतात त्यामुळेच उसाचे उत्पादन दुप्पट होते.त्यामुळेच या उसाला एकरी 90ते 100टन उत्पादन मिळत त्यामुळेच उस करताना नेहमीच आडसाली लागवड करावी .




[[लागवडीखालील शेतकऱ्यांच उत्पादन कमी येण्याची कारण ]]

लागवडीखालील शेतकऱ्यांच उत्पादन कमी येण्याची कारण 

1)आपले उत्पादन कमी येण्याचे कारण म्हणजेच शेतकरी परंपरागत चालत आलेल्या नियमानुसार काय काय शेतकरी लागवड करतात कारण जर ऊसाला हवा खेळती राहीली तर ऊसाच उत्पादन वाढेल. 

2)उसाची लागवड करताना आपण साडेचार ते पाच फूट  सरीचा वापर करावा लागेल व बेन हातरताना प्रत्येक उसात ऐक फूट अंतर ठेवून लागवड करावी


3)उस लागवड केल्यापासून ते कारखान्यात तुटून जाईपर्यंत जर उसाची संख्या जर पाच हजार राहीली तरच उत्पादन चांगले मिळत.काय काय शेतकऱ्यांच्या उसाची संख्या पाच हजारापेक्षा जास्त किंवा पाच हजार पेक्षा कमी  असते  त्यामुळेच काही शेतकऱ्यांच उत्पादन कमी निघत


4)काही शेतकऱ्यांना माञ भांडवलाची कमतरता व वाढती महागाई यामुळेच काही शेतकऱ्यानाच शेती करणे परवडत नाही .


5)जर आपल पीक किडीला बळी पडले तरी उत्पादनात घट होते.त्यामुळेच शेतकऱ्यांच उत्पादन कमी होत .


6)लागवड  जर आपण योग्य वेळी केली नाहीतर उत्पादन कमी होते काय काय शेतकरी आठ ते दहा महिन्यात उस कारखान्यात  पाठवतात. त्यामुळेच त्यांच उत्पादन कमी निघत.


7)जर आपल्या उसाला 15महीने पूर्ण झाले तरी आपला उस काही कारणास्तव जर कारखान्यात जाण्यास उशीर झाला तरी आपल्या उगाच वजन घटत परिणामी उत्पादन कमी होते.


8)जर आपल्या उसाची वेळेवर खांदणी झाली नाहीतर आपल्या उसाची पांढरी मुळी सुटत नाही आणी  त्यामुळेच आपल्या उसाची वाढ होत नाही.



9)उसाला पाण्याची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणावर असते .त्यामुळेच जर उसाला पाणी जर कमी पडले तर  उत्पादन कमी होते.जर आपण पाटपाणी देत असेल तर मात्र भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो .पाणीही जास्त लागते.ड्रिप जर नसेल तर आपणास विद्राव्य खते हे पाट पाण्यात देता  येत नाहीत. 






[[उसाचे उत्पादन कसे वाढवावे]]

1)जर आपण साडेचार ते पाच फूट अंतर सरी सोडली तर आपले उसाच उत्पादन वाढेल कारण या सरीत हवा खेळती राहते व त्यामुळेच उसाची वाढ मोठ्या प्रमाणावर होते.


2)जर आपण उसात तननियंञण योग्य प्रकारे केल तर  आपण टाकलेली खते पिकांना मिळतील त्यामुळेच उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल. 



3)जर आपण ड्रिप च्या माध्यमातून विद्राव्य खते जर सोडली तर आपण उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ करु शकतो.


4)जर आपण आपल्या पिकांना वेळेवरती टॉनिक ची फवारणी केली तर आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होते.


5)जर आपण आपल्या उसाची बांधणी करण्यापूर्वीच कोंबडी खाद्य व रासायनिक खत यांचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या उत्पादन वाढ होते


6)जर आपण आपल्याच पिकांची वेळेवर लहान व मोठी बांधणी केली तर आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होते.


7)जर आपण पिकांना ह्यूमिक  ॲसिड जर सोडले तर आपण टाकलेले जे खाद्य आहे ते खाद्य पिकांना योग्य प्रमाणात मिळत त्यामुळेच आपल्या जर पिकाची वाढ झालेली नसेल तर ह्यूमिक ॲसिड सोडावे त्यामुळेच  त्यांना योग्य ती न्यूट्रिशन मिळतात व पिकांची वाढ होते.




8)पिकांची योग्य वाढ व्हावी यासाठीच आपण ड्रिप मधुन 19;19;19,052:34:34ही विद्राव्य खते सोडावीत व त्यामुळेच आपले उत्पादन वाढेल .







[[सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर ]]

1)शेणखत हे आपण रान नांगरणी पुर्वी रानात टाकावे एकरी  10टन जरी टाकले तरी चालेल. 


2)शेणखत जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर तागासारख 40 दिवसाच पीक घेऊन ताग रानात गाढाव .


3)रासायनिक खतांचा वापर करत असतानाच त्यात निंबोळी पेंड चा देखील वापर करावा.



4)त्यामुळेच लावणीच्या वेळी युरिया 4,पोटॅश 2,मॅग्नेशियम 2,10:26:26 बॅग 2अश्या प्रकारच्या भेसळ डोसचा वापर करावा हा डोस कांडीच्या खाली टाकून घ्यावा व नंतर कांडी टाकून घ्यावी


5)त्यानंतर उस उगवण झाल्यावर त्याला प्रथम ह्यूमिक ॲसिड ने ड्रिंचिंग करून घ्यावे .त्यानंतर उस दोन ते आडीच महिन्याचा झाल्यावर त्यावर 19:19:19 याची फवारणी करून घ्यावी.फवारणी करून झाल्यावर लगेच  दहा ते पंधरा दिवसांत उसाला रेघ मारून घ्यावी .रेघ मारण्याच्या आगोदर युरिया 2,निंबोळीखत2,पोटॅश 2,10:26:26एक बॅग अशी रेघ मारुन घ्यावी.नंतर उसाला चार ते पाच महीने पूर्ण झाल्यावर मोठी बांधणी करूण घ्यावी .मोठी बांधणी करण्यापूर्वीच आपण 40बॅग कोंबडीखत ,युरिया,पोटॅश 2,10:26;26 बॅग 2,मॅग्नेशियम बॅग 2,bhumata2,अश्याच प्रकारची खते टाकून बांधणी करुन घ्यावी .बांधणी झाल्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसातून एकदा 19;19;19हे खत द्यावे त्यामुळेच उसाचा पोत सतत चालत राहील व उसाची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल. त्याचबरोबर उसाची जाडी वाढावी यासाठी052:34:34  

 खत सोडावे.त्यामुळेच उसाच्या वजनात वाढ होईल. 




[[उसात कोणकोणती आंतरपीके घ्यावी]]

1)उसात  जर आपण लागवड केल्यावर आपण मक्याची लागवड केली तर उसाला मार बसण्याची शक्यता असते त्यामुळेच आपण उसात जर आंतरपीक म्हणून मका जर लावली तर आपण वरंब्यावर मका टोचावी  परिणामी  उसाला पण मार बसणार नाही  .

2)कांदा 

!!जर आपण उसात आंतरपीक म्हणून कांदा या पिकाची निवड केली तर मात्र उसाला काहीच अडचण येणार नाही कारण कांदा या पीकाचा  उसाला फायदा.  होतो कारण जर आपणास कांदा या पीकास जर बाजारभाव नसेल तर आपण कांदा या पिकाला जमिनीत गाडून त्याचा खात करू शकतो त्यामुळेच आपणास कांदा हे पीक फायदेशीर आहे.


3)कोथिंबीर 

!!जर आपण उसात आंतरपीक म्हणून कोथिंबीर लावली तर आपणास  कोथिंबीर पासून चांगले उत्पादन मिळत  .कोथिंबीर लावल्यावर आपणास तननाशक मात्र मारता येत नाही.फक्त खुरपणीचा खर्च तेवढाच वाढतो  .



4)गाजर

!!जर आपण उसात गाजर जरी लावले तरी आपणास त्यापासून उत्पादन मिळत व आपला खतांवर होणारा खर्च हा आंतरपीकामुळ भरून निघेल .







[[उसाची आंतरमशागत  व तननियंञण कसे करावे]]

1)आपण प्रथम उसाची लागवड करून घ्यावी .नंतर त्याला आपण पाटपाणी द्यावे पाणी दिल्यावर 24तासाच्या आत अल्ट्रा टाॅप  व गोल दोनशे लीटर पाण्यात मिसळून फवारून घ्यावे त्यामुळेच तनांची उगवण होणार नाही परिणामी तननाशकावर व खुरपणीवर होणारा खर्च टाळता येइल. 



2)उस उगवण झाल्यावर जर थोडे थोडे तन दिसायला लागले तर आपण टेंझर या तननाशकाची फवारणी करून घ्यावी .त्यामुळेच उसाला टॉनिक मिळत व तनही जळत.




3)जर तननियंञण आपण मारलेल्या तननाशकावर झाले नाहीतर आपण आपला उस खुरपून घ्यावा.





[[उसाची बांधणी कधी करावी]]

उसाची बाळ बांधणी तीन महिन्यांत करावी.


उसाची मोठी बांधणी   लागवड केल्यावर चार ते पाच महिन्यात करावी .त्यात  औजारान वरंब फोडून बांधणी करुन घ्यावी.नाहीतर पावर ट्रेलर च्या साहाय्याने उसाची बांधणी करुन घ्यावी.






[[पाणी व्यवस्थापन ]]

उसाला पाणी व्यवस्थापन चांगल्याच प्रकारच असाव कारण उसाला  पाणी हे जास्त लागत त्यामुळेच उसाला जर आपणास पाट पाणी  असेल आपण मोकळ पाणी उसाला देउ शकतो.पण जर आपण ठिबक सिंचन चा वापर केला तर  आपले उत्पादन वाढेल .







Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming