कृषी शिक्षणाचे महत्व
[[कृषी शिक्षणाचे महत्त्व
●शेतकऱ्यांना कृषीच्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला आहे.
●भारत हा कृषिप्रधान देश आहे या देशातील 70टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका करण्याचे साधन ही शेती आहे .आपल्या देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.महाराष्ट्रात सुमारे 70लाख लोक शेती करतात. आपल्या देशातील 30टक्के शेतकऱ्यांकड एक ते दोन हेक्टर पर्यंत रान आहे
.दोन ते चार हेक्टर पर्यंत क्षेञ फक्त वीस टक्के लोकांकडे एवढेच रान आहे . सात लाख शेतकऱ्यांकड चार हेक्टर ते पाच हेक्टर रान असून ,दहा हेक्टर पेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी अत्यंत कमी आहेत. यापैकी बरेच क्षेञ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.त्यामुळेच शेतकऱ्याना खाञीशीर उत्पादन मिळण्याची शाश्वती नसते . आपल्याकडे जमीनीचे क्षेञ कमी प्रमाणात असल्यामुळेच व सिंचनाची सोय उपलब्ध नसेल तर त्यामुळेच अपुऱ्या पाण्याची सुविधा यामुळेच शेतकऱ्यांना म्हणावे तेवढेच उत्पादन निघत नाही.
मर्यादित जमीनीचे क्षेञ आणी अपुऱ्या सिंचनाच्या सुविधा यामुळेच आपल्याला म्हणावे तेवढेच उत्पादन कस मिळणार याचा विचार करणे आवश्यक आहे .शेतकऱ्यांचा प्रयत्न व शासकीय यंञणा यांचा सहभाग करून आपणास अपेक्षित उत्पादन मिळणार आहे.
((शेतीचे उत्पादन कसे वाढवाल))
शेतीचे उत्पादन कसे वाढणार याबाबत आपण नीट करण आवश्यक आहे .शेतीचे उत्पादन वाढाव यासाठीच आपणास शेतीची योग्य मशागत करण आवश्यक आहे. शेतीचे उत्पादन वाढाव यासाठीच प्रमुख गोष्ट ही भांडवल आहे .ज्या शेतकऱ्यांकड भांडवल अतिशय कमी प्रमाणात आहे त्या शेतकऱ्यांना भांडवलासाठी सावकारी कर्ज किंवा बॅक पतसंस्था यांच्यावर अवलंबून रहावे लागते. त्या शेतकऱ्यांना भांडवलाबरोबरच सिंचनाची सोय करावी लागणार आहे .अनियमित पाऊस त्यामुळेच शेतकऱ्यांच उत्पादन कमी होत चाललाय आहे यामुळेच यावर एकच उपाय की शासनाकडून यासाठीच शेतकऱ्याना काहीतरी मदत मिळावी .आणी त्यात अजून महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की आपण पेरणीसाठी वापरनार बी बीयाण हे चांगल्या काॅलीटीच असण आवश्यक आहे .कारण खराब आणी कीडक बीयाण जर शेतीसाठी वापरल तर त्याचा आपल्या उत्पादनावर परिणाम होईल. जर आपण पेरणी केलेल्या पिकावर जर कीडीचा प्रादुर्भाव जर झाला तर आपण त्यावर कीटकनाशक नाशक मारून घ्यावे त्यामुळेच कीडीचा प्रादुर्भाव होणार नाही . महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून व विशेष अस प्रशिक्षण घेउन शेतकऱ्यांना सुधारीत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल .पीकाच बाजारातील नवनवीन वान,खतांच्या माञा किती द्यायच्या ,पेरणीची पद्धत कुठली वापरायची ट्रॅक्टर ने पेरणी करायची का बैलाने .पेरणी ॲटोमॅटीक मशिनद्वारे करायची का पेरणी करण्यासाठीच आपली जुनी पद्धत फन पाळी घालून त्यात आपल पीक पेरून घ्याव .
[[ शेती सुधारीत तंत्रज्ञान]]
●महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ या ठीकाणी शेतीसाठी सुधारीत तंत्रज्ञान संशोधन करण सातत्यन सुरू आहे .शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहीती व्हावी .शेतीच तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहीती व्हावेत यासाठीच शेतकऱ्यांना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती च्या उत्पादनात वाढ व्हावा विविध माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढाव यासाठीच प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच शाळा व काॅलेज यांच्या माध्यमातून शेतीविषयक शिक्षण दिले जात आहे .प्रत्येक व्यवसाय करत असतानाच त्या व्यवसाय संबंधित ज्ञान असण आवश्यक आहे .शिक्षणामूळ घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग होतो .त्यामुळेच आज वैद्यकीय, अभियांत्रिकीत,पशुसंवर्धन या क्षेञात
शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या क्षेत्रात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग यशस्वीपणे होत आहे .शेती व्यवसाय शास्त्र आणी कला यावर आधारित आहे .म्हणून शेती शास्ञाची आणी त्यातील कौशल्याची माहीती घेण आवश्यक आहे .शास्त्रीय ज्ञानादवारे आपण पिकांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करावा लागतो .एखाद्या माणसाला जर आजार झाला तर ङाॅक्टर त्याचे कारण शोधून लगेच त्या आजाराच निदान करतात. शेती क्षेत्रात अश्याच अनेक बाबी आहेत त्यावर आपण अभ्यास करण आवश्यक आहे•
●जमीनीत असणारे अन्न घटक यावर शेतीचे उत्पादन अवलंबून आहे.
खते देताना जमीनीत कुठल्या प्रकाराची अन्न द्रव्य उपलब्ध आहेत याचा अभ्यास मातीपरीक्षणा द्वारे करण आवश्यक आहे .आपण त्यानुसार पीकांना कुठली अन्न द्रव्य देणार हे त्यावर अवलंबून आहे .त्यामुळेच पीकांना योग्य प्रमाणात अन्न द्रव्य आपण देउ शकतो .त्यामुळेच आपले उत्पादन वाढणार आहे .पीकांना जेवढ लागेल एवढेच पाणी द्यावे.जर आपल्याच पिकावर कीडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण त्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी सोडून आळीपासून त्याच संरक्षण करू शकतो .जर गरज नसताना पाणी दिले तर ते पीक पिवळ पडण्याची शक्यता असते •
●जर एखाद्या गाव असेल तर त्या गावात आरोग्य सेवा आसण आवश्यक आहे .तसेच शेती करत असताना आपल्यातील एखादा शेतकरी चांगला अनुभव असलेला असावा तर उत्पादन वाढ करण्यात मदत होणार आहे .शेतीच्या हंगामानुसार कुठल्या पिकाची लागवड करायची ही त्या त्या हंगामानुसार ठरत असते .यासाठीच शेतीविषयक माहीती आपणास आवश्यक आहे .कृषी तज्ज्ञ हे जर ग्रामीण भागात असतील तर शेती बाबत काहीच अडचण येणार नाही . महाराष्ट्रातील सरकारने आणी विद्यापीठ कृषी शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. कृषी विद्यापीठात सध्या बरेच विदयाथी शिक्षण घेत आहेत त्यामुळेच आपण आपल्याच मुलांना शेतीच शिक्षण देऊन त्याना शेतीत नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीच प्रवृत्त केल पाहीजे •
[[[/////]]]]]]///////////////////////////////////////////////////////////////