भारतीय शेती समस्या व समाधान
[[भारतीय शेती समस्या व समाधान ]]
[आपण आता भारतीय शेतीतील समस्या काय आहेत ते पाहूया]
●आपल्या भारताला शेतीसाठी पोषक असे वातावरण व निसर्ग असून सुद्धा आपल्या देशात शेतीच्या समस्या वाढत आहेत कारण जरी शेतीला पोषक असे वातावरण जरी आपणास लाभले असले तरी आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यामुळेच आपल्या देशातील शेतकरी जरी कष्टाळू असला तरी पण आपणास हवे तेवढे उत्पादन शेतकऱ्यास मिळत नाही. सततच्या रासायनिक खतांच्या वापरातून आपल्या जमीनीचा पोत कमी होत चालला आहे .त्यामुळेच आपल्याला हव तेवढेच उत्पादन मिळत नाही.निर्सगचक्राच्या सततच्या बदलामुळे कधी महापूर तर कधी पाण्यावाचून पिके जळून जातात यामुळे नापिकी चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळेच येथील शेतकरी कर्ज बाजारी झाला .जर एखाद्या वेळेस पाउस वेळेवर झाला निसर्गाने साथ दिली उत्पादन जर चांगल मिळाल तरीपण शेतकऱ्यांना पाहीजे एवढा बाजारभाव माञ मिळत नाही .शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना म्हणावा तेवढा बाजारभाव मिळत नाही •
●शेतीची रासायनिक घटक आहेत त्यांचा होणारा घातक असा परीणाम यांच्याबाबतीत म्हणावी तेवढी माहीती आपणास नाही व रासायनिक खत यांचा अतिवापर वाढत चालला आहे याचा परिणाम असा झाला आहे की यामुळेच आपल्या जमिनीचा पोत कमी होत चालला आहे .त्यामुळेच उत्पादनात घट होत चालली आहे. जगात इतर देशात बेन असलेली कीटकनाशक आपल्याच देशात वापरली जातात. केलेल्या पाहणीत त्यांना अस आढळून आल की 12टक्के अंश हा मान्यता नसलेल्या कीटकनाशकांचा अंश आढळून आला .याचाच अर्थ असा आहे की शेतीच्या रासायनिक खत वापरण्यास आणी उत्पादन करण्यास कायदा आणी नियमांचे बंधन नाही.एकीकडून असे सांगितल जात की आपण जे कीटकनाशक वापरत आहोत ते सुरक्षित आहे यात शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे आणी दुसरीकडे मात्र मान्यताप्राप्त नसणारी कीटकनाशकांचा वापर केला जातो .कारण आपण वापरलेली कीटकनाशक कींवा तननाशक यांचे कण पाण्यात उतरतात त्यामुळेच ते पाणी पीण्या योग्य राहत नाही ते
पाणी आपण जर पीण्यास वापरल तर अश्या पाण्यातून बऱ्याच प्रकारचे आजार होतात•
●रासायनिक खतांच्या अतिवापर केल्यामुळेच आपणास फळे असोत भाजीपाला असो सगळीकडेच कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळेच कर्करोग होण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे . आपण तनाशक वापरल तर ते निष्क्रिय होते जमीनीवर त्यांचा कुठलाही वाईट परिणाम होत नाही, असे दुकानदार सांगतात. त्यामुळे शेतकरी आपल्या रानातील तन लवकर नियंत्रण करण्यासाठी व आपले पैसे वाचवण्यासाठी तननाशकाचा वापर करतात. त्यामुळेच त्याचा परिणाम पिकावर होतो. परिणामी उत्पादन क्षमतेत घट होते•
●भारतीय पारंपारिक शेती ही शेणखतावर अवलंबून होती त्यामुळेच भारतीय लोक सर्वात जास्त निरोगी होते .पण वेळ बदलत चालली त्यामुळेच बदलत्या काळानुसार शेती करण्याची पद्धत बदलत चालली आहे .कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर करू लागला आहे. त्यामुळेच जमिनीचा पोत कमी होत चालला आहे•
●आपल्या देशात त्यातल्यात्यात आपल्या महाराष्ट्र राज्य पंजाब सरकार च्या दिशेने वाटचाल करत आहे ही चिंतेची बाब आहे आज आपल्या राज्यात तननाशक व कीटकनाशक यांच प्रमाण वाढत आहे •
●भारतीय शेतकरी शेती करत असताना जुन्या पद्धतीचा जस पाट पद्धतीन आपल्या रानाला पाणी देत आहे त्यामुळेच त्यांना राञी अपराञी कधीही लाइट आली की पाणी देण्यासाठी जावे लागते त्यामुळेच शेतकऱ्यांची फार धावपळ होते .लाइट अवेळी येन जाण यामुळेच शेतकरी ञस्त आहे.त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यानीच ड्रिप चा अवलंब केला पाहीजे म्हणजेच त्यांची पाण्यासाठी होणारी धावपळ होणार नाही .कधी पाणी असेल तर वेळेवर लाइट नसते तर लाइट असली तर ट्रान्स्फरम चालत नाही. कधी मोटर जळते •
● एखाद्या शेतकऱ्याना खते उपलब्ध होतात तर काही शेतकऱ्याना खत असून उपलब्ध होत नाहीत त्यामुळेच शेतकरी कधी कधी निराश होतो. एखाद्या शेतकऱ्यांना पिकांना जर भांडवलासाठी आडचण येत असेल तर त्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. . एखाद या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे कर्ज मिळत.एखाद्या शेतकऱ्यांनाच काही कर्ज मिळत नाही.परिणामी शेतकऱ्यांना सावकारी कर्ज घ्यावे लागते•
{ ॥भारतीय शेती समाधान ॥}
●भारतीय लोकांचा पारंपरिक काळापासून चालत आलेला व्यवसाय शेती आहे .त्यामुळेच भारतीय शेतकरी आपल्या शेतात पिकांची लागवड करत असताना आपल्या घरात असलेलेच बियाणे वापर करतो याचा परिणाम उत्पादनावर होतो .त्यापेक्षा शेतकऱ्यानीच प्रक्रीया केलेले बियाणे वापरल तर उत्पादन चांगल मिळत .शेतकऱ्यानीच लागवड करत असताना आपल्या रानात 10;26;26किंवा युरिया टाकुन घ्यावा त्यामुळेच पिकांची उगवण लवकर होते व पिकांची वाढ फास्ट होते •
●भारतीय शेतकरी शेती करत असताना पुर्वी पाट पाण्याची पद्धतीन पाणी दिल जायच पण आता बदलत्या काळानुसार पाणी ड्रीप च्या साह्याने दिले जाते व त्यामुळेच पाणी वेळेवर मिळते व पिकांना लागेल एवढेच पाणी मिळत त्यामुळेच शेतकऱ्यांची होणारी धावपळ थांबली आहे.ड्रिप सिस्टीम बसवल्यावर आपण त्यातून पिकांसाठी लागणारी औषधी सोडू शकतो .त्यामुळेच आपले उत्पादन वाढत चालले आहे •
●भारतीय शेतकरी बदलत्या काळानुसार आपली शेती करण्याची पद्धत बदलत आहे त्यामुळेच भारतीय शेतकरी रासायनिक खत कीटकनाशक यांचा अतिवापर करत आहे याचा परिणाम अतिशय वाईट होत आहे त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यानीच रासायनिक खतांचा अतिवापर न करता शेणखत कींवा कंपोस्ट खत किवा जैविक खत ,गांडूळ खत यांचा वापर आपल्या रानात करावा कारण गांडूळ खत वापर केल्यास आपल्या जमिनीची सुपिकता वाढणार आहे•
●आपला शेतकरी पाण्याचे योग्य असे नियोजन करत नाही .जर आपल्याला उन्हाळ्यात पाणी कमी पडत असेल तर आपण पावसाळ्यात शेततळे बांधूण शेततळ पावसाळ्यात भरुन घेतले पाहिजे म्हणजेच आपणास उन्हाळ्यात पिकाला जर पाणी कमी पडले तर आपणास त्या पाण्याचा वापर पिकांसाठी करता येतो त्यामुळेच आपण शेतीच्या पाण्याचे नियोजन योग्य वेळी करण गरजेच आहे शेतीला पाणी कमी पडु नये म्हणुन पाणी हे जमीनीत मुरावे यासाठीच पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवून आपल्या रानातील ओढे, नाले यांच्यावर बांध टाकावेत .परिणामी पाण्याची पातळी वाढत जाणार आहे•
●भारतीय शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या शासनाच्याच साहाय्यक योजनेचा वापर करून घेतला पाहीजे .आपल्या देशात शेतकऱ्यांसाठी बऱ्याच प्रकारच्या संघटना आहेत या संघटनेच्यामार्फत आपल्या समस्या सोडविण्यात येतात•
●विविध शैक्षणिक ,विज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधली पाहीजे •
●भारतीय शेतीचा अधिक अधिक विकास व्हावा व भारतीय शेतकऱ्यांच शेतीतील उत्पादन वाढाव यासाठीच काय करावे ते पाहुया
●जमीनीची धुप
●जमीनीची धूप सतत होत आहेत त्यामुळेच जमिनीची धूप जर झाली तर जमीन ही नापीक बनेल.त्यामुळेच जमिनीची धूप थांब विण्यासाठी आपण वृक्षतोड करणे थांबवावी .जिथे जिथे डोंगर रागावर उतार आहे अश्या ठीकाणी पाउस आला तर मात्र माती वाहुन जाते त्या ठीकाणी बांध घालून घ्यावेत म्हणजेच जर एखाद्या वेळेस जर मोठा पाऊस झाला तर आपली माती वाहून जाउ शकते.त्यामुळेच जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होइल म्हणून बांध टाकावेत .
जमिनच्या उताराला नांगरट करू नये तेथे रोगाची लागवड करावी त्यामुळेच जमीनीची धूप होणार नाही •
●भारतीय शेतकरी अजुन जुनाट तर कधी कधी किडक बियान वापरून आपली लागवड करतो परीणाम उत्पादन कमी निघत. त्यामुळेच शेतकऱ्यानीच असे बियाण न वापरता चांगल बियाणे वापराव•
●भारतात शेती करण्यासाठीच भरपूर अशी शेतजमीन उपलब्ध आहे पण त्यातील काही जमीन उताराची अशी आहे .सपाट अशी जमीन नाही•
●जमीनीची सुपिकता कायम राखण्यासाठी जमिनीत नैसर्गिक खताचा वापर केला पाहीजे •
●भारतातील ज्वारी ,बाजरी ,मका,कापूस ही पीक किडी च्या प्रादुर्भावामूळ नष्ट होतात यासाठीच शेतकऱ्यानीच वेगवेगळ्या प्रकार च्या कीटकनाशकांचा वापर करून आपल्या पिकाचे संरक्षण केले पाहिजे •
●पारंपारिक शेती करण्याच्या पद्धतीत बदल केला पाहजे आता नवीन यांञीकी करण्याच्या साह्यने शेती केली पाहीजे तरच उत्पादनात वाढ होईल•
●पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात काय ते थोड्या प्रमाणात आपणास वापरायला सापडत बाकीच पाणी वाहून जात हे पाणी वाहून जाउ नये म्हणून तलाव, बांध बांधुन हे पाणी आडवून ठेवावे•