गांडूळखत निर्मिती

 जमिनीचा  पोत, उत्पादन   क्षमता  टिकवण्यासाठी  सेंद्रिय  खतांचा  वापर महत्त्वाचा  आहे  .यासाठी गांडूळ खताचा  वापर महत्त्वाचा  ठरतो .!!



खतनिर्मिती   

गांडूळ खत निर्मिती  करण्यासाठी तयार केलेल्या  ढिगांमधून  पाण्याचा योग्य निचरा सोबतच  40ते50टके ओलावा टिकावा याची काळजी घ्यावी.ढिगातील  तापमान 20ते30अंश दरम्यान असावे.तसेच पूर्णवेळ सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. ढिगातील गांडूळांचे वाळवी, बेडूक,  साप,मुंग्या ,गोम ,उंदीर यांच्यापासून संरक्षण करावे. 



खतासाठी ढीग तयार करण्याची पद्धत 

सुरुवातीला  ढिगाच्या  बुडाशी 15 सेंटिमीटर जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा म्हणजेच गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन व तुरीचा पालापाचोळा  यांचा  थर करावा सेंद्रिय पदार्थांचा थरावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती 3:2प्रमाणात मिसळावी 


गांडूळ  खतांचे फायदे 

गांडूळ खतात नञ,स्फुरद,पाला तसेच दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात .जमिनीची उत्पादकता आणी पोतामध्ये सुधारणा  होते.जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते ,धूप कमी होण्यास मदत होते.जमिनीतील गांडूळ खतांमूळे मातीच्या थरांची उलथापालथ होते.त्यामुळेच जमिनीत खोलवरील पिकांसाठी उपयुक्त आहे.जमिनीचा कस टिकून राहतो.उत्पादन क्षमतेसोबतच जमिन सुपीक होउन हवा खेळती राहते त्यामुळेच पिकांमध्ये पांढऱ्या मुळीची योग्य प्रकारे वाढ  होते.


गांडूळ खत निर्मिती 

पाण्यामध्ये शेण कालवून 10सेंटिमीटर जाडीची थर तयार करावा सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेला  सुरुवात होईल कुजलेले अन्न गांडूळाला खाद्य म्हणून उपयुक्त राहील..

शेवटी ढिगावर सेंद्रिय पदार्थांचे 15सेंटीमीटर जाडीचे आच्छादन करावे.आवश्यकतेनुसार दररोज किंवा दिवसाआड तयार झालेल्या ढिगावर पाणी शिंपडावे..

साधारणतः एक ते दोन आठवड्यानी ढिगातील उष्णता कमी झाल्यावर त्यावरील सेंद्रिय पदार्थाचा थर बाजूला सारून गांडूळ सोडावी.गांडूळ सोडल्यावर पुन्हा सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन करावे,नियमित पाणी द्यावे गांडूळ खत निर्मितीसाठी जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो.उत्तम प्रतीच्या गांडूळ खतांचा रंग काळसर चहा पावडर सारखा झाल्यावर गांडूळ खत तयार होते.गांडूळ खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे.




Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming