शेळीपालन
शेळीपालन करण्यासाठी गोठा व्यवस्थापन
.जर आपल्याकडे जुना गाईचा गोठा असेल तर त्या जुन्या गोठ्याला चिटकून 12बाय80फूट आकाराचा हवेशीर अशा शेडची उभारणी करावी.!
सध्या मुक्त व बंदिस्त पद्धतीने शेळ्याचे संगोपन केले जाते !!
शेडमध्ये लहान पिल्ले ,बोकड आणी मोठ्या शेळ्या अशी विभागणी केली त्यासाठी साधारण चार विभाग केले ..
शेडमध्ये लहान मोठ्य मिळून 40शेळया आणी पैदाशिकरता 1बोकड ठेवावा.
शेळ्यना मुक्त संचार करता यावा यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करावी लागते.
गोठ्यात एकही विकत घेतलेली शेळी नसावी आधी शेळ्या आहेत त्यांची संख्या वाढवत न्यावी.
हवामानानुसार व्यवस्थापन
ऋतुनुसार शेळयांच्या व्यवस्थापन पद्धतीत वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल केले जातात. जेणेकरून हवामान बदलाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.
थंडीच्या काळात पिल्लांना उबदार वातावरणात ठेवावे.वजन आणी वयानुसार दुध पाहावे.
पावसाळ्यात शेड स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर भर द्यावा
उन्हाळ्यात गोठा हवेशीर राहील याची काळजी घ्या
विक्री नियोजन
मागील 12 वर्षाच्या शेळीपालनातील अनुभवातून शेळीपालनातील सर्व कामाचे नियोजन करणे सोपे झाल आहे प्रत्येकवेळी मिळालेल्या अनुभवातून व्यवस्थापनात आवश्यकतेनुसार योग्य ते बदल केले पाहिजेत त्यामुळेच शेळीपालन व्यवसायात यश मिळते..
फॉर्ममध्ये वर्षभर खरेदी विक्री सुरु असते शेळ्याची फक्त विक्री करायची नाही .मागणीनुसार बोकडाची फक्त विक्री करावी वर्षाला 50 नगापर्यंत तरी विक्री व्हावी बोकडाला प्रती किलो सहाशे ते सातशे रुपये दर मिळतो.. आहार. आरोग्य आणी खाद्य व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यामुळे अपेक्षित वजन मिळण्यास मदत होते.
वेळोवेळी लसीकरण केल्यामुळेच शेळ्या आणी बोकड आजाराना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.. बोकडाच्या थेट विक्रीवर भर दिला तर विक्रीखर्चात बचत होते.