"मिरची लागवड "
मिरची लागवड करण्यापूर्वीच आपण प्रथम रानाची नांगरट करून घ्यावी. त्या नंतर रोटर मारावा. रोटर मारल्यानंतर पावर ट्रेलर च्या साह्याने बेड तयार करून घ्यावेत. त्या बेडवर 10;26;26,युरिया,10किलो थायमिट टाकावे त्यानंतर मल्चिंग हातरून घ्यावे .नंतर 24तास पाणी सोडून मिरची लागवड करावी.
'"मिरची लागवड केल्यावर तयारी "
मिरची लागवड केल्यावर प्रथम आपन दोन तास पानी सोडावे.
पानी नंतर बंद करून टाकावे त्यानंतर दोन दिवसानी त्याला ह्यूमिक ॲसिड ची आळवणी करावी. आळवणी केल्यावर त्याला दहा दिवसात delicate आणीnionची फवारणी करावी कारण मिरची या पिकाला आळी पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळेच त्यावर प्रथम कीटकनाशक फवारून आळीच नियंत्रण करावे लागते.नाहीतर तर त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही .त्यानंतर आपण जर दहा दिवसाला 19:19:19,मॅग्नेशियम, 052:34:34असे घटक सोडावे .झाड चांगले आणी निरोगी राहण्यासाठी जर 20दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी त्यामुळे पीक निरोगी होईल . उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल!!
मिरची साठी. कुठली जमीन निवडावी= मिरची साठी माळरान जमिन अतिशय उपयुक्त आहे . मिरची लागवड केलेली जमीन पाण्याचा निचरा करणारी असावी .कारण जर जमीन भुसभुशीत असेल तर अशा जमीनीत पाण्याचा नीचरा होत नाही परिणाम पिक रोगाला बळी पडते व पीक खराब होते. त्यामुळेच मिरची लागवड करताना माळरान व पाण्याचा निचरा करणाऱ्या जमीनीत लागवड करावी.
मिरची बाजारभाव =मिरची या पिकाला बाजारात फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे .मिरची ही रोजच्या ऊपयोगातील वनस्पती आहे .त्यामुळेच मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे .हॉटेल मध्ये तर मिरची रोज वापरली जाते .वडापाव ,ग्रेव्ही बनवण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. मिरचीला जर. आपण अर्धा एकर लागवड केली . अर्ध्या एकरात चार हजार रोप लागतात एका झाडाला एक किलो मिरची निघाली तर चार हजार झाडात आपणाला चार टन माल निघतो .जर एका किलोला चाळीस रूपयात दर पकडला तर चार टन मिरची पासून आपणास एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो .खर्च वगळून एक लाख रुपयांपर्यंत नफा राहतो.हा फक्त एका तोडण्यचे
उत्पादन आहे .असे पाच ते सात तोडे होतात त्यापासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळते.