शेती काळाची गरज

 शेती ही काळाची गरज आहे  . कारण आपल्याला कच्चा माल हा  शेतीपासून मिळतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे . येथील बरेच उद्योग शेतीवर अवलंबून आहेत     


1)साखर निर्मिती उद्योग = साखर उद्योग हा सुद्धा  शेतीवर आधारित आधारित उद्योग आहे .कारण साखर निर्मीती साठी  ऊस लागतो  व उसापासून साखर निर्मिती होते  .इथेनॉल  हे  सुद्धा उसापासून तयार करता येते  .इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे याचा पेट्रोल मधे  मिक्स  करुन  इंधन म्हणून वापर करता येतो


2)उसापासून आपणास  गूळ तयार करता येतो .त्यासाठी  प्रथम  उसाच्या शेतात जाऊन  त्याची गुणवत्ता तपासली जाते.  ज्या  उसाची  रिकवरी  21 ते22 आहे असा उस निवडला  जातो त्या उसाला 10ते11 महीने पूर्ण  व्हावे  लागतात  .त्यामुळे उसाला चांगलाच दर मिळतो  उसाच्या गुणवत्तेत व वजनात होणारी घट टाळली जाते .उसाच्या अनेक जातीपैकी गुणवत्तापूर्ण अशी एक जात निवडली  जाते  शिवाय अशा गुणवत्तापूर्ण उसापासून बनवलेल्या गुळाला आकर्षक  रंग  येतो. असा गुणवत्तापूर्ण उस तोडणीनंतर गृहाळात आणला  जातो.

 .नंतर त्याचे  वजन केले जाते त्यानंतर उसाचे कृषींग केले जाते.तोडणीनंतर  24तासाच्या आत कृषींग करणे आवश्यक असते साधारणपणे 1हजार लीटर उसाच्या रसासाठी 2 टन उस आवश्यक असतो .कृषींग करत असताना हा रस गाळून  tank मध्ये जमा केला जातो  हा. रस  नंतर  गृहाळातील वर असलेल्या  tank मध्ये  पाठवला जातो  नंतर तो उकळण्यासाठी ठेवण्यात  येतो या उसाच्या रसात चुना पावडर,   भेंडी पावडर, फॉस्फरस ॲसिड  मिसळले जाते.या रसात पी एच पातळी सहा येईपर्यंत  उकळून घ्या .अंदाजे अर्धा तास उकळल्यावर त्यातून मल म्हणजेच मळी बाहेर यायला लागते  सुरूवातीची मळी काढल्यावर त्यात भेंडी द्रावण मिक्स करावी त्यामुळे राहीलीली मळी कामगार बाहेर काढून टाकतात. साधारणत 90अंश सेल्सिअस तापमानाला काकवी तयार होते.ही काकवी काहीली मधून काढून रस गाळून एका टाकीत भरून ठेवावा.ती काकवी गार व्हायला 24तास लागतात. काकवी काढून टाकल्यावर गूळ करपू नये म्हणुन त्यात  तेल पावडर घातली जाते सतत ढवळत रहाव लागते साधारणतः 110किवा 120अंश सेल्सिअस तापमान लागते गूळ तयार होतो.


 

3)शेती ही काळाची गरज आहे कारण कच्चा माल ना कुठल्याच कंपनीत तयार होत. कच्च्या माल माञ शेतकऱ्यांकडून  घ्यावा लागतो व नंतर त्या मालावर प्रक्रीया करून तो माल बाजारपेठेत आणला जातो.

उदाःहरभरा शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून पोलीश करून हरभरा डाळ तयार करण्यात येते




4)कापूस =कापूस हा कच्चा माल आहे.कापसापासून कापड तयार केले जाते याचा उपयोग करून वसञ  तयार केली जातात. 



5)लाकूड =लाकडापासून पलायवूड तयार केले जाते  त्यापासून  सोपासेट बेड कपाट तयार केले जाते. 



Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming