शेती मधील क्रांति
शेती हा व्यवसाय जुन्या काळापासून चालत आला आहे .पण आता बदलत्या काळानुसार शेतीमधे बदल करून आपण उत्पादनात वाढ करू शकतो.
1)शेतीमधे drip इरिगेशन या नवीन तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे . Drip इरिगेशन मूळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते व पिकांची वाढ अतिशय जोमदार अशी होते . पिकांना वाटेल त्या वेळेस पाणी उपलब्ध होते. Drip इरिगेशन मूळे रासायनिक खतांचा खर्च कमी होतो आपण खत drip मधून देउ शकतो drip इरिगेशनमूळे पाण्याची मोठ्य प्रमाणात बचत होते आपण पाण्यामध्ये विद्राव्य खते सोडू शकतो
2)शेतीमधे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास आपल्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे शेतीमधे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीची कामे नवनवीन अवजार वापरून गतिमानतेने कामे होत आहेत जून्या काळात नांगरणी करायची वेळ आली तर त्याला एक दिवस एक पूरत नव्हता पण आता ते काम ट्रॅक्टरच्या साहायने काही क्षणातच काम पूर्ण होते .पेरणी यंञ आल्यामुळे आता पेरणीचा खर्च कमी झाला आहे आता सर्व प्रकारची यंञ आली आहेत कोळपणी यंञ. कोळपणी यंञामूळे खूरपणीची कामाला गतिमानता आली आहे खूरपणी अतिशय कमी खर्चात होउ लागली आहे . आता मार्केट मधे टोकण यंञ उपलब्ध आहे त्या यंदाच्या साह्यने बी टोचण सोपे झाले आहे.
3)शेतीमधे नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे नवनवीन तननाशक बाजारात उपलब्ध आहेत ती वापरून आपण तन नियंत्रण करू शकतो त्यामुळेच खर्चाची बचत होते तननाशक 1)altra top _ हे तननाशक जर तन उगवण्यापूवीॅ मारले तर आपल्या रानातील तणांची उगवण होत नाही परिणामी पीक चांगले येते.
2)tenzar tannashak=हे तननाशक मका या पिकातील महत्त्वपूर्ण तननाशक म्हणून ओळखले जाते याचा उपयोग मका या पिकातील सर्व प्रकारची तने नष्ट करण्यासाठीच होतो .याचा उपयोग टाॅनिक म्हणून सुद्धा होतो याची फवारणी केल्यावर मका या पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते व तन नियंत्रण सुद्धा होते.
3),कीटकनाशक _मका या पिकावर आळी पडली तर आपण निवोन आणी प्रोकलॅन वापरून आळी नियंत्रणात आणू शकतो.
4)शेतीमधे नवनवीन विद्राव्य खते उपलब्ध आहेत ही खते dripमधून सोडता येतात 19.19. 19., 052 34 ,
अशी बरीच खते उपलब्ध आहेत त्यामुळेच बर्याच प्रमाणात खतांवर होणारा खर्च कमी झाला .रासायनिक खते जर मातीत टाकली तर ती उडून जाण्याची शक्यता असते म्हणून ही खते डायरेक्ट drip मधून सोडली तर ती पाण्यात मिसळून डायरेक्ट पिकांच्या मूळांना मिळते त्यामुळेच उत्पादनात वाढ होत आहे .रासायनिक खतांचा खर्च कमी झाला आहे.
5)शेतीमधे नवीन तंत्रज्ञान रेन पाइप आल्यामुळे पाणी देण्यात येणे सोप झाल आहे आपण आपल्याला हव असेल तेव्हा रेन पाईपच्या साहाय्याने पावसासारख रानाला पाणी देउ शकतो